आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या दहा बाय बाराच्या खोेलीत भरतो सव्वाशे मुलांचा वर्ग, पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोंडवाड्यासारखी स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - अंबडलिंक रोडवरील संजीवनगर येथील जाणता राजा चौक येथे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर भरणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुुुले ज्ञानमंदिर या लहान मुलांच्या अंगणवाडीला क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी परिसरातील अस्वच्छतेमुळे कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन अर्ज दिले असून, ही परिस्थिती सुधारल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्वांना शिक्षण या योजनेची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, संजीवनगर परिसरात कष्टकरी हातावर काम करणाऱ्या गोरगरीब लोकांची वसाहत आहे. या ठिकाणी महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर दहा बाय बाराच्या पत्र्याच्या जागेत १२५ लहान मुलांची अंगणवाडी भरते. कमी जागा असल्याने दाटीवाटीने मुले या वर्गात बसतात. या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा ही असून नसल्यासारखी आहे. या ठिकाणी मोकळ्या भूखंडावरवरील कचऱ्यामुुळे या स्वच्छतागृहात विषारी प्राण्यांचा उपद्रवही वाढला आहे. त्यामुळे मुलांच्या जिवाशी चाललेला खेळ पालिकेने थांबविण्याची मागणी होत आहे.

सर्व शिक्षा अभियानात जिल्हा परिषद महापालिका यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी प्रयत्न केले जात असताना प्रभाग ५० मधील या अंगणवाडीला प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे चक्क कोंडवाड्याचे स्वरूप आले आहे. त्यातच महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तातडीने उपाययोेजना करावी, अशी मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे. पालिकेने तातडीने या प्रश्नी लक्ष दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

अत्यंत दुरवस्थेतील पत्र्याचे शेडवजा स्वच्छतागृह आणि कोंडवाड्यासारखा वर्ग अशा परिस्थितीत ही अंगणवाडी भरलेली असते.

प्राथमिक सुविधा पुरविणार
-अंगणवाडी बाबत तक्रारआली आहे. साफसफाईसाठी माणसे पाठवली आहेत. परिसराची पाहणी करणार असून, गरजेनुसार आवश्यक त्या प्राथमिक सोयीसुविधा पुरविल्याजातील.
-आर. आर. गोसावी, विभागीय अधिकारी, सातपूर
बातम्या आणखी आहेत...