आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक अधिकाऱ्यांसाठी ‘चिराग’चे नेटवर्क डाउनच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आश्रम शाळा तसेच वसतिगृहात राहणाऱ्या लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, मुलांना पळवून त्यांना भीक मागायला लावणे, लहानवयात कामाला जुंपणे आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ‘चिराग’ नावाचे नवे अॅप विकसित करण्यात आल्याचे महिला आणि बालविकास विभागाकडून सांगितले जाते. मात्र, हे अॅप अाहे कुठे हाच संशाेधनाचा विषय झाला अाहे. हे अॅप चालते कसे, त्याची तक्रार जाते कुठे अाणि पुढे या तक्रारीचे काय हाेते याची काेणालाही माहितीच नाही. मग हे अॅप तयार करण्याचा अाणि त्याचे उद‌्घाटन करण्याचा गवगवा कशासाठी हा प्रश्न उपस्थित हाेताे. हे अॅप त्या-त्या शहरातील महिला बालकल्याणच्या विकास विभागातील अधिकारी, पाेलिसांपर्यंतच पाेहाेचलेले नाही तर नागरिकांपर्यंत पाेहाेचणे दूरच. 
 
हे अॅप बघितले तर या अॅपवर अत्यंत चांगली माहिती देण्यात अाली अाहे. शिवाय मदतीसाठी काही नंबरही देण्यात अालेले अाहेत. पण, हे अॅप नागरिकांपर्यंत पाेहाेचले नसल्याने त्याचा काहीही उपयाेग हाेत नसल्याचे सिद्ध हाेेत अाहे. जर हे अॅप प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पाेहाेचले असते तर बाल लैंगिक घटनांना काहीअंशी तरी अाळा बसला असता. पण, शासनाचे काम म्हणजे केवळ देखावा या वृत्तीतच हे अॅप अडकल्याचे दिसून येत अाहे. हे अॅप डाउनलाेड हाेते, पण ते वापरणे अत्यंत अवघड अाहे. काय करायचे हेच त्यातून कळत नाही. शिवाय त्याची भाषाही इंग्रजी असल्याने भाषेची माेठीच अडचण निर्माण हाेते. 

बाल लैंगिक शाेषणाच्या तक्रारीसंदर्भातील अॅपची माहितीच नाही 
महिलांसाठी हेल्पलाइन नंबर : महिलांसाठी ९७६२१००१०० आणि ९७६२२००२०० 

पत्रके मिळतात, हे अॅप नाही माहिती 
^लहानमुलांवरील अत्याचार महिला सुरक्षाविषयी होणाऱ्या उपाययोजनांविषयी पत्रके येतात. मात्र, चिराग या अॅपची आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, पोलिस प्रशासनाकडून इ-बॉक्स हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात अत्याचार पीडित मुलांना ऑनलाइन इ-मेलवर तक्रार करता येते. मनीषाकाशिद, सहायक पोलिस निरीक्षक, महिला सुरक्षा विभाग. 

माहिती देण्यात अालेली नाही 
^महिला बालकल्याण विभागाच्या चिराग अॅपसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही. मात्र, पोलिस प्रशासनाकडून लहान मुलांवरील अत्याचाराविषयी जनजागृती केली जात आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयात भेट देत याविषयी कार्यक्रम घेतले जात आहे. सचिनगोरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 
 
घटना 
ओढारोडवर आई-वडिलांसोबत राहणारी एक बालिका सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी असताना संशयिताने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी नेले. अतिशय क्रूरपणे तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर तिला घरी सोडून दिले. मात्र, तिला चक्कर येऊ लागल्याने तिची आई गाेंधळून गेली. बालिकेची विचारपूस केली असता तिने रडत रडत आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अाईने मुलीला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तिरस्कार आणणारी घटना दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे गेल्या महिन्यात घडली होती. रात्रीच्या सुमारास तेथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातील ओट्यावर भांडी घासण्याचे काम करीत असताना पोलिसाने पाठीमागून येऊन या मुलीचे तोंड दाबून तिला बाथरूममध्ये नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या मुलीने आरडाओरड केल्याने तिचे भाऊ कुटुंबीय तसेच नागरिकांनी धाव घेतल्यानंतर त्यांनी त्या मुलीची संबंधित पोलिसाच्या ताब्यातून सुटका केली होती. 
 
केवळ उद‌्घाटनाचा गवगवा 
महाराष्ट्रराज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना संसदेने पारित केलेल्या बालहक्क संरक्षण कायदा २००५च्या तरतुदींनुसार झालेली आहे. या कायद्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने तयार केलेल्या जाहीरनाम्यावर भारताने स्वाक्षरी केली आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य बालहक्क आयोग सुरू करण्यात आला. त्यानंतर महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या चिराग अॅपचे उद‌्घाटनही झाले. मात्र, त्याच्यावर आलेल्या तक्रारींचे निराकरण कसे हाेते हा संशाेधनाचा विषय ठरत अाहे. 

अॅपची जनजागृतीच नाही : बालहक्कसंरक्षण कायदा २00५ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने ‘चिराग’ हे अॅप विकसित केले आहे. या अॅपवर प्रामुख्याने लहान मुलांवरील अत्याचाराच्या तक्रारी करता येतात. बालकांचे लैंगिक शोषण, भीक मागायला लावणे आदी अनेक प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर होत असतात, मात्र नेमकी कशी तक्रार करावी, याची माहिती अॅपवर नाही. तसेच हे अॅप नक्की काय अाहे, त्याचे काम कसे चालते यासंदर्भातही काेणतीच माहिती जनताच काय, पण अधिकाऱ्यांपर्यंत पाेहाेचलेली नाही. 
 
अधिकारी म्हणतात, ‘चिराग’बद्दल अाम्हाला माहिती नाही 
आईस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून चार वर्षाच्या बालिकेवर अमानुषरित्या शारीरिक अत्याचार केल्याची घटना ताजी अाहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या बालहक्क संरक्षण अायाेगाकडून सुरू करण्यात अालेल्या ‘चिराग’ अॅपसंदर्भात अाढावा घेण्याचा प्रयत्न केला असता हे अॅप केवळ शाे असल्याचे निदर्शनास अाले अाहे. हे अॅप कसे चालते यावर तक्रार केल्यानंतर ती कुठे जाते, त्या तक्रारीचे पुढे काय हाेते, ती तक्रार कुठे वर्ग हाेते याची काेणतीही माहिती स्थानिक महिला बालकल्याण विकास अधिकारी वा पाेलिसांनाही नसल्याचे यानिमित्ताने पुढे अाले अाहे. माेठा गवगवा करत उद‌्घाटन केलेल्या या अॅपसाठीचा अाणि त्यासाठी राबत असलेल्या यंत्रणेवरील खर्च वाया जात असल्याचेच यातून निष्पन्न हाेत अाहे. त्यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझाेत... 
 
देवेंद्र राऊत, महिला बालकल्याण विकास अधिकारी 
{गेल्या काही दिवसांपासून लहान मुलींवर वाढलेल्या अत्याचारांच्या घटनेविषयी महिला बालकल्याण विभागाच्या वतीने काय पावले उचलली जात आहे? 
{महिलाबालकल्याण विभागाच्या वतीने यासंदर्भात विविध उपाययोजना केल्या जातात. त्या नागरिकांपर्यंत पाेहाेचविण्याचाही प्रयत्न हाेताे. या उपाययाेजनांमध्ये नागरिकांचाही सहभाग अावश्यक अाहे. 
{महिलाबालकल्याण विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चिराग अॅपची माहितीही कोणाला नाही. त्याचे काय? 
{चिरागअॅप केंद्र राज्य शासनाकडून तयार करण्यात अालेले अाहे. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारासंबंधित तक्रार करण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याचा वापरही होत आहे. 
{चिरागअॅपवरील तक्रारीची नोंद कुठे केली जाते? 
{चिरागअॅपवर तक्रार केल्यानंतर त्याची नोंद संबंधित तक्रार निवारण विभागाकडे जात असेल. अापल्याला त्याची पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन मी सांगू शकेल. पण या अॅपबरोबरच नागरिकांनी पोलिस ठाण्यातही तक्रार केली पाहिजे किंवा चाइल्डलाइनच्या हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर तक्रार करू शकतात. 
बातम्या आणखी आहेत...