आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको कार्यालय स्थलांतरास मुख्यमंत्र्यांची अखेर स्थगिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडको प्रशासकीय कार्यालय ऑगस्टपासून औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती मिळाली आहे. याप्रश्नी आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्थगिती दिली. कार्यालयाच्या स्थलांतराला स्थगिती मिळाल्याने सिडकोवासियांनी या निर्णयाचे स्वागत केले. 
 
सिडको महामंडळाद्वारे नाशिकमध्ये १९७० साली गृहनिर्माण योजना राबविली गेली. घरे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यातील असल्याने त्याला प्रतिसाद लाभला सहा योजना उभ्या राहिल्या. सिडकोने घरे हस्तांतरण बँक ना हरकत पत्र दिले. मात्र, पाणी, रस्ते मैदाने पालिकेकडे हस्तांतरित केले. त्यामुळे सिडकोने नाशिक येथील कार्यालय ३१ जुलै रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हे कार्यालय ऑगस्ट २०१७ पासून औरंगाबाद येथे स्थलांतरित होणार होते. त्यामुळे सिडको कार्यालयाकडून फक्त १४ जुलैपर्यंतच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत होते. सिडको प्रशासकांनी हे कार्यालय बंद केल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला होता. 

सिडकोच्या निर्णयाविरोधात सिडको नागरिक संघर्ष समितीच्या धनंजय बुचडे, गणेश पवार, दीपक कापडणीस, अमोल सोनवणे, राहुल भदाणे, आबा वाणी, निवृत्ती धात्रक, संजय सोनवणे, बाळा दराडे, वि. गो. पेंढारकर, डी. टी. इंगळे, किरण थोरात, निंबा सूर्यवंशी आदींनी सिडकोच्या प्रशासक कांचन बोधले यांना निवेदन देत स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली होती. 
दरम्यान, आमदार सीमा हिरे यांनी याप्रश्नी लक्ष घालून, मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविला. 

ऑनलाइन कारभारात नागरिकांचा संभ्रम 
सिडको कार्यालय स्थलांतरीत करण्यापूर्वी ऑनलाइन कारभाराबाबत सर्व माहिती नागरिकांना देणे आवश्यक आहे. अनेक कागदपत्रे ही ऑनलाइन देणे-घेणे शक्य नाही. शिवाय काही कागदपत्रांवर सही अंगठे देणे शक्य नाही. काही माहिती हवी असल्यास नाशिकहून औरंगाबाद येथे जाणे शक्य नाही. बँकेत चलन भरणे यातही गोंधळ आहे. सर्वच बाबींची माहिती नागरिकांना सविस्तर देण्याबाबत सिडको प्रशासकांनी कोणतीही काळजी घेतली नाही. केवळ आदेश आला म्हणून अमलबजावणी सुरू होती. याबाबत सर्वसामान्य नागरिकांत तीव्र संताप होता. 

स्थगिती दिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय टळली 
^सिडकोतील महत्त्वाच्या कामांसाठी सिडकोवासीय सिडको प्रशासकीय कार्यालयात जात होते. मात्र, कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतरित झाल्यास मोठी गैरसोय होणार होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने नागरिकांचा प्रश्न सुटला आहे. -सीमा हिरे, आमदार 
बातम्या आणखी आहेत...