आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर बस चालवण्याचा एसटीचा पुन्हा महापालिकेपुढे प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला शहर बससेवा चालवणे डाेईजड झाल्याचे चित्र असून, एप्रिल १५ ते ऑक्टोबर १६ या कालावधीदरम्यान तब्बल १९ कोटी रुपयांचा तोटा झाला अाहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी याेजनेत परिवहन सेवा समाविष्ट करून घ्यावी, असे पत्र देत एसटी महामंडळाने पुन्हा महापालिकेच्या काेर्टात शहर बससेवेचा प्रस्ताव टाेलावला अाहे.
शहरवासियांनच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सर्वसामान्यांना अतिशय सोयीची ठरणारी राज्य परिवहन मंडळाच्या शहर बससेवेच्या ताेट्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढच होत आहे. उत्पन्नाचा आलेख खाली जात असल्याने शहर बससेवा चालविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच वाढती वाहतूक कोंडी, अवैध प्रवासी वाहतूक, खासगी वाहनांची वाढती संख्या आदी कारणांमुळे या तोट्यात अधिकच भर पडत आहे. परिणामी, एप्रिल २०१५ ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत शहरी प्रवासी वाहतुकीत तब्बल १९ कोटी रुपयांचा तोटा एसटी प्रशासनाला सहन करावा लागला आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार, डिझेल, व्यवस्थापन आदींवर होणाऱ्या खर्चामुळे शहरी प्रवासी वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर तोटा भरून काढण्यासाठी महापालिकेने १९ कोटी रुपये प्रतिपूर्ती म्हणून एसटी प्रशासनाला द्यावे. तसेच, स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या शहराच्या प्रवासी वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी म्हणून महापालिकेनेच शहरी वाहतुकीची व्यवस्था करावी. याबाबतचे पत्र एसटी प्रशासनाकडून महापालिका आयुक्त महापौरांना देण्यात आले. यामुळे शहरी प्रवासी वाहतुकीचा चेंडू आता महापालिका प्रशासनाच्या कोर्टात टोलावला गेला आहे, याबाबत काय निर्णय होतो, याबाबत सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, दाेन महिन्यांपूर्वी हे पत्र महापालिकेला अाल्याचे मान्य करीत यासंदर्भात अद्याप कारवाई झाली नसल्याचे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. हे पत्र महासभेसमाेर ठेवले जाणार असून, त्यानंतर सर्वानुमते चर्चा करून निर्णय हाेईल.

साधारण २००७ मध्ये तत्कालीन महापाैर विनायक पांडे विराेधी पक्षनेते उत्तम कांबळे यांच्या काळात शहर बससेवा महापालिकेमार्फत चालवण्याचा प्रस्ताव गाजला हाेता. त्यासाठी इंदूरचा दाैराही झाला हाेता. मात्र, शहर बससेवेचा पांढरा हत्ती पाेसण्यावरून विराेध झाल्यानंतर हा प्रस्ताव मागे पडला. एस. टी. महामंडळ अधूनमधून महापालिकेला प्रस्ताव पाठवते तेथून नकार मिळताे, असे अाजपर्यंतचे चित्र राहिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...