आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिटी बस’ची धाव २० हजार किमीने कमी, वाढत्या तोट्यामुळे एसटीचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य परिवहन महामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असतांना दुसरीकडे शहर बससेवेमुळे एसटीच्या तोट्यात भर पडत आहे. दिवसेंदिवस वाढणारा ताेटा लक्षात घेता एसटी प्रशासनाकडून शहरातील विविध मार्गांवरील बसफेऱ्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे. यापूर्वी शहरात दरराेज साधारणत: २२० बसेस ४४ हजार किलोमीटर धावत होत्या, मात्र तोटा कमी करण्यासाठी या फेऱ्यांची संख्या अाता कमी करण्यात अाली असून, अाता फक्त २५ हजार किलोमीटर अंतर बस धावतील. या निर्णयाचा सर्वाधिक फटका विद्यार्थी कामगारांना बसणार अाहे. 
 
परिवहन मंडळाच्या नाशिक विभागात शहर बससेवेमुळे दर महिन्याला साधारणत: दोन ते तीन कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. वाढणारा प्रचंड तोटा, इंधनाचे वाढलेले दर, खासगी वाहनांची वाढलेली संख्या, बसेसच्या देखभाल खर्चामुळे एसटी प्रशासनाला शहर बससेवा चालवणे अवघड बनले आहे. या सर्व बाबींचा विचार करत एसटीला हाेणाऱ्या ताेट्याची भरपाई महापालिकेने करावी किंवा शहर बससेवा स्वत: चालवावी, असे पत्र एसटी महामंडळाने महापालिका प्रशासनास दिले होते. मात्र, पालिकेने त्यास अपेक्षित प्रतिसाद दिल्याने तोटा भरून काढण्यासाठी तोट्यात असलेले कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील बस फेऱ्या बंद वा कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. शहर बससेवेचा विचार केला तर दरराेज २२० बसेसद्वारे ४४ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक केली जात होती. मात्र, एसटी प्रशासनाच्या निर्णयामुळे सद्यस्थितीत एसटीच्या बसेस ३१ हजार किलोमीटरच धावत अाहेत. येत्या काही दिवसांत तोट्यातील आणखी काही बस फेऱ्या बंद वा कमी करण्यात येणार असल्याने शहरी प्रवासी बस केवळ २५ हजारच किलोमीटर धावणार आहे. बस फेऱ्या बंद करण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी कामगारांना बसणार आहे. 

अाकडेवारी अशी 
२२०बसद्वारेशहरात प्रवासी वाहतूक. 
४४हजारकिलोमीटर यापूर्वी हाेत असे दरराेज प्रवासी वाहतूक. 
३१हजारिकलोमीटर सध्या दररोज प्रवासी वाहतूक. 
२५हजारकिलोमीटर यापुढे हाेणार दररोज प्रवासी वाहतूक. 
कोटी रुपये दर महिन्याला होत अाहे शहर बससेवेतून ताेटा. 

..तर या तीन मार्गांवरच धावतील बस 
एसटीच्या शहर बससेवेमुळे हाेणार ताेटा कमी करण्यासाठी एसटी प्रशासनाकडून शहरात केवळ निमाणी-नाशिकरोड, निमाणी-उत्तमनगर, निमाणी-सातपूर या तीन मार्गांवरच शहरी बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

‘नाशिक दर्शन’ सेवा बंद होण्याच्या मार्गावर 
नाशिक शहरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक पर्यटक येतात. या पर्यटकांच्या साेयीसाठी एसटी महामंडळाने ‘नाशिक दर्शन’ ही बससेवा सुरू केली हाेती. या बसद्वारे सध्या राेज अवघे ते १० प्रवासी नाशिक दर्शनाचा लाभ घेत अाहेत. यामुळे तोट्यात सापडलेली नाशिक दर्शन बस सुविधाही येत्या काही दिवसांत बंद करण्याबाबत एसटी प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...