आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बससेवेच्या दीडशे फेऱ्या बंद, ताेटा वाढल्याने एसटी महामंडळाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एसटी महामंडळाच्या शहर बससेवेचा ताेटा दिवसेंदिवस अधिकच वाढू लागला अाहे. यामुळे उत्पन्न कमी झालेल्या मार्गावरील वाहतूक कमी करण्याचे धोरण एसटी प्रशासनाने स्वीकारले आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन वर्षापासून शहरातील एकूण प्रवासी वाहतुकीपैकी १६०० ते २००० किलोमीटरच्या फेऱ्या कमी केल्या अाहेत. 
 
गेल्या दीड वर्षात एसटीला सुमारे १९ कोटींचा तोटा शहर बससेवेमुळे सहन करावा लागला आहे. त्यातच वाढत्या खर्चामुळे एसटीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शहर बससेवा सुरू ठेवण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त करत महापालिकेने ही सेवा चालवावी, असे पत्र एसटीने पालिकेला दिले अाहे. मात्र, पालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने एसटीच्या अडचणी वाढल्या. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शहरातील विविध मार्गांवरील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात अाला असून, सुमारे १५० बसफेऱ्या बंद करण्यात अाल्या. यात इंदिरानगर, पाथर्डी फाटा, देवळाली कॅम्प या मार्गावर बसफेऱ्या कमी केल्या आहेत. शहर बससेवेची यापूर्वी शहरातील ४१ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक होत होती, आता ती ३९ हजार किलोमीटरवर असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, एसटीच्याया निर्णयाचा कर्मचारी, विद्यार्थी यांना फटका बसणार अाहे. 

पालिकेच्यालेखी उत्तराची प्रतीक्षा : शहरबससेवा चालविण्यास घ्यावी, असे पत्र एसटीने पालिकेला पाठविले अाहे. मात्र, या प्रस्तावास पालिकेने नकार दिला असून, पालिकेचे लेखी उत्तर प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...