आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर साैंदर्यीकरणात ‘डेब्रिज’चे अडथळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटीत समावेश झालेल्या नाशिक शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या घाेषणा करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींकडून प्रत्यक्षात मात्र त्यांची पूर्तता करण्यात दुर्लक्षच केले जात अाहे. शहराच्या विकासात अडसर ठरणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यात पालिका प्रशासनाकडून वारंवार काणाडोळाच केला जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत. शहराच्या साैंदर्यीकरणाबाबतही पालिका प्रशासनाकडून विविध उपाययाेजना केल्या जात असताना प्रत्यक्षात त्यातही उद्दिष्टपूर्ती हाेताना दिसून येत नाही.
शहरातील मखमलाबाद परिसर, शरणपूररोड, नासर्डी नदी पूल, इंदिरानगर, पाथर्डी परिसर, पाइपलाइनराेड, गंगापूरराेड या परिसरातील मोकळ्या भूखंडांवर तसेच रस्त्यांवर कोणत्याही कारवाईची भीती बाळगता सर्रासपणे डेब्रिज, दगड, कचरा आणून टाकला जात असल्याने या भूखंडांना डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाट्टेल तेथे मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात असल्याने परिसराच्या विद्रूपीकरणातदेखील भर पडत आहे.

या डेब्रिजमुळे परिसरातील रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना धुळीचा सामना करावा लागत असून, कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला अाहे. विशेष म्हणजे, अनधिकृतपणे मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे अधिकार असतानादेखील बांधकाम खाते आरोग्य विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसून उलट एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न केला जात असल्याचे दिसून अाले.

अपघातांत वाढ; तरी कारवाईकडे दुर्लक्षच
रस्त्याच्या कडेला डेब्रिज अाणि बांधकाम साहित्य टाकले जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले अाहे. वाहने घसरून पडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांनी डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठाेर कारवाईची मागणी केली अाहे. मात्र, कारवाई हाेत नसल्याने हे प्रकार वाढत अाहेत.

वाढती अस्वच्छता ठरतेय धाेकादायक
डेब्रिज टाकले जात असल्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, माेठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रार देऊनही त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचा तक्रारी परिसरातील नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’कडे केल्या. पालिकेच्या उदासीन वृत्तीचा फटका नागरिकांना बसताेय.

लोकप्रतिनिधी, अधिकारी हतबल
मखमलाबादरोड परिसरात महापालिकेत कार्यरत अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधींचे वास्तव्य अाहे. असे असतानाही मात्र या परिसरात मोकळे भूखंड रस्त्यालगत डेब्रिज टाकण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून अाले. मात्र, अद्यापपर्यंत हे प्रकार राेखण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहेे.

स्मार्ट अॅपवर तक्रार करूनही उपयोग नाही
मखमलाबादपरिसरातील मोकळ्या भूखंडावर तसेच रस्त्यावर डेब्रिज टाकले जात असल्याची तक्रार एका नागरिकाने पालिकेच्या स्मार्ट अॅपद्वारे केली. त्यानंतरही अद्यापपर्यंत हे डेब्रिज हटविण्याची वा साफसफाईची कारवाई झालेली नाही. मात्र, पालिका अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी माेहीम राबवून सर्व काही स्वच्छ केले असल्याचे उत्तर देत तक्रारीकडे डाेळेझाक केली गेली. प्रशासनाने स्मार्ट अॅप सुरू केले खरे, मात्र त्यावर केलेल्या तक्रारींचा निपटारा वेळीच होत नसल्याने नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या अाहेत. डेब्रिजबाबतही अनेक तक्रारी असताना कारवाई हाेतच नसल्याने नागरिकांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली अाहे.

^मोकळ्या भूखंडांवरीलकचरा हटविण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. अशा कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जावी. -शोभा मते
^मोकळ्या भूखंडांबरोबरचरस्त्यालगतही डेब्रिज टाकले जाते. या प्रकारामुळे अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. -मनीषा शिरोळे
आरोग्याचा प्रश्न गंभीर; कारवाई व्हावी
^डेब्रिजमुळेपरिसरातकचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रचंड अस्वच्छता पसरली अाहे. परिसरातील रहिवाशांचे अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. -सुनीता साळुंखे
तातडीने कठाेर कारवाई करावी
^शहराच्यासौंदर्यीकरणालाबाधा ठरणाऱ्या या प्रकारांना अाळा घालणे गरजेचे अाहे. पालिकेने विशेष माेहीम राबवून कुठल्याही भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठाेर कारवाई करायला हवी. -स्वाती थोरात, त्रस्त रहिवासी

अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे
^मोकळ्याभूखंडांवरसर्रासपणे डेब्रिज टाकले जात अाहे. त्यामुळे अाराेग्य धाेक्यात अाले अाहे, शिवाय परिसराच्या विद्रुपीकरणातही भर पडत आहे. पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. -सुनीता वानखेडे, त्रस्त नागरिक

रात्रीच्या वेळी डेब्रिज टाकले जात असल्याच्या तक्रारी
मखमलाबाद, पाथर्डी फाटा, सातपूर, नासर्डी पूल परिसरात मोकळ्या भुखंडावर, रस्त्यालगत सर्रासपणे डेब्रिज टाकले जाते. स्थानिक नागरिकांकडून होणारा विरोध तसेच महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी रात्रक्षछ्या वेळेस डेब्रिज टाकले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष माेहीम राबविण्याची मागणी संबंधित परिसरातील त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
..तर दंडात्मक कारवाई करणार
देशातील १०० स्मार्ट सिटींच्या पंगतीत जाऊन बसलेल्या नाशिक शहराच्या साैंदर्यीकरणावर पालिका प्रशासनाकडून भर दिला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र नियमांना केराची टाेपली दाखवत सर्रासपणे मिळेल त्या माेकळ्या भूखंडावर वा रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजमुळे ‘सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक’ संकल्पनेलाच छेद बसत अाहे. अनेक माेकळ्या भूखंडांना डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने अाराेग्याचा प्रश्नही डाेके वर काढू लागला अाहे. अाराेग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई हाेत नसल्याने नागरिकांकडून वाट्टेल तेथे डेब्रिज टाकले जात असल्याचे दिसून येत अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
शहरातील माेकळ्या भूखंडांवर सर्रास टाकले जाते डेब्रिज; पालिकेच्या बांधकाम अाराेग्य विभागाकडून कारवाईकडे काणाडाेळा
पी. बी. चव्हाण, बांधकामविभाग, नाशिक महापालिका
{ अादेशाचे उल्लंघन करून मिळेल त्या मोकळ्या भूखंडांवर सर्रासपणे डेब्रिज टाकले जात अाहेत. त्याबाबत काय?
-अनधिकृतपणे शहरातील मोकळ्या भूखंडांवर वा कुठल्याही रस्त्यालगत डेब्रिज टाकले जात असेल, तर त्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
{डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने असे करणाऱ्यांचे धारिष्ट्य वाढत अाहे. अापल्या विभागाकडून सातत्याने कारवाई का केली जात नाही?
-शहरातील मोकळ्या भूखंडांवर अनेकदा रात्रीच्या वेळेस डेब्रिज आणून टाकले जाते, असे दिसून अाले अाहे. त्यामुळे कारवाई करण्यात बऱ्याचदा अडचणी येतात. यावर लवकरच ताेडगा काढला जाईल. जेणेकरून अशाप्रकारे डेब्रिज टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...