आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरवासीयांच्या आरोग्यासाठी 14 फेब्रुवारीला धावणार पाेलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराचे अाल्लाददायक वातावरण अाणि आरोग्य संपदेची सांगड घालत पोलिस प्रशासनाकडून आयोजित ‘नाशिक रन’च्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेला राज्यासह देशभरातील नागरिकांनी प्रतिसाद देत ऑनलाइन नोंदणी केली. 
 
१४ फेब्रुवारीला होणाऱ्या या स्पर्धेत प्रथमच राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय खेळाडूंसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील सिनेतारक आणि तारिका सहभागी होत आहेत. ३, ५, ११ आणि २१ किमी या अर्धमॅरेथॉनसाठी लाख ६० हजारांच्या बक्षिसांसह प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. 
 
पोलिस प्रशासन शहराच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असते. याचप्रमाणे शहरवासीयांच्या आरोग्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. २०१६ मध्ये पहिल्या अर्धमॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला.
 
 या मॅरेथाॅनची दखल देशभरात घेण्यात आली. हा पायंडा पुढे सुरू ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दुसरी अर्धमॅरेथाॅन आयोजित केली अाहे. या स्पर्धेसाठी प्रथमच ऑनलाइन प्रवेश मागवण्यात आले. 
 
स्पर्धेत पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आरोग्य जागृतीचा संदेश देणार आहेत. या स्पर्धेत १५ हजार स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता असून, आतापर्यंत हजार स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेश घेतला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. सिंगल, उपआयुक्त विजय पाटील, दत्ता कराळे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे यांनी दिली. 
 
जय्यत तयारी : मॅरेथॉनसाठी पोलिस प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील जॉगिंग ट्रॅक, मैदान आणि नागरिकांशी थेट संपर्क साधून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 
 
स्पर्धकांना टी-शर्ट : स्पर्धकांसाठी ३, ५, ११ आणि २१ किमी असा पर्याय ठेवण्यात आला आहे. ज्या स्पर्धकाला सहभागी व्हायचे आहे त्यास किमीप्रमाणे टी-शर्ट दिले जाणार आहेत. हे टी-शर्ट माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहे. 
 
सिनेतारक-तारिकांचा सहभाग : 
अर्धमॅरेथॉनसाठी मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील सिनेतारकांसह अभिनेते सहभागी होणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अाघाडीचा नायकाने स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.
 
सुदृढ आरोग्यासाठी देणार संदेश 

-नागरिकांच्या आरोग्यासाठीही मॅरेथॉन अायोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय खेळाडूंसह मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेकलावंत स्पर्धेसाठी सहभागी होत आहेत. आरोग्याच्या जनजागृतीसाठी स्पर्धेत सहभागी व्हा. -डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
बातम्या आणखी आहेत...