आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीसाठी स्वतंत्र लेन, ‘लेफ्ट हॅण्ड ड्रायव्हिंग’साठी पोलिस करणार जागृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील वाहतूक नियोजन सुधारण्याच्या दृष्टीने दुचाकींसाठी स्वतंत्र लेन सुरू करण्यात येणार अाहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने एकाच लेनमध्ये मार्गक्रमण करत असल्याने अपघातांची शक्यता अधिक असते. स्वतंत्र लेनमुळे अपघात टाळले जाणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. पोलिस आयुक्तांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना या नियोजनाचा प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या अाहेत. 
 
शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. रस्ते मात्र जैसे थे आहेत. वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक विभागाची दमछाक होते. वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण होता. रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. हेल्मेटसक्ती कारवाईनंतरही बहुतांशी दुचाकी चालक हेल्मेट वापरत नसल्याचे निदर्शनास येत अाहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकीसाठी लेफ्ट हॅण्ड ड्रायव्हींग लेन आणि चौपदरी रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यासाठी पालिका प्रशासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. दुचाकी लेनमधून फक्त दुचाकी आणि रिक्षांची वाहतूक होणार आहे. यासाठी सिग्नलच्या वेळेतही काही सेकंदाचा बदल करण्यात येणार आहे. प्रथम दुचाकी आणि नंतर इतर वाहन असे नियोजन करण्यात येणार आहे. या नियोजनामुळे वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. सिबिएस, गडकरी चौक, मेहर, गंगापूरनाका, सांगली बँक या सिग्नलवर पहिल्या टप्प्यात हा प्रयोग करण्यात येणार आहे. हे नियोजन यशस्वी झाल्यास शहरातील सर्वच रस्त्यांवर लेफ्ट हॅण्ड ड्रायव्हींगसाठी स्वतंत्र लेन सुरू करण्यात येईल. वाहतूक विभाग लवकरच तज्ज्ञांकडून याबाबत मार्गदर्शन घेणार आहे. ‘इंटलिजन्ट ूट्रॅफिक सिस्टम’ मध्ये हा प्रस्ताव मनपा प्रशासनास पाठवण्यात येणार आहे. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील हा अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करणार आहेत. 

लेफ्ट हॅण्ड नियम प्र‌भावीपणे राबवणार 
^‘डाव्याबाजूने चला’ या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला दुचाकीसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. सिग्नलच्या वेळेत काही सेकंदांचा बदल करण्यात येणार आहे. यावर नियोजन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात दुचाकी चालकांमध्ये डाव्या बाजूने चालण्यासाठी जागृती केली जाणार अाहे. -लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त 
सुखद सोमवार 
बातम्या आणखी आहेत...