आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: ‘ट्रॅफिक सेल’ माध्यमातून अाता शहराची वाहतूक समस्येतून मुक्तता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहतुकीच्यासमस्येवर रामबाण उपाय करण्यासाठी महापालिका अायुक्तांनी ट्रॅफिक सेलची निर्मिती करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण घाेषणा यंदाच्या अंदाजपत्रकात केली अाहे. यात अाॅफस्ट्रिट अाॅनस्ट्रिट पार्किंगसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात अाली अाहे. तसेच शहरातील विविध भागांमध्ये राेटरी पार्किंग विशेष अनुदानातून विकसित करण्यात येणार असल्याचे अायुक्तांनी सांगितले. ट्रॅफिक सेलसाठी ‘दिव्य मराठी’ अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत अाहे. 
 
स्थायी समितीसमाेर सादर केलेल्या अंदाजपत्रकात अायुक्तांनी वाहतुक कक्षाची नव्याने निर्मिती करण्यात येत असल्याचे म्हटले अाहे. शहरातील वाहतुकीच्या समस्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढून अनेक निष्पापांचा त्यात बळी गेला अाहे. या समस्या निर्मितीस पाेलिस विभागाला कारणीभूत मानले जात असले तरीही त्यापासून महापालिका नामानिराळी राहूच शकत नाही अशी स्थिती अाहे. शहरातील वाहतुकीचा माेठा संबंध महापालिकेचाही अाहे. 

शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, पार्किंग स्थळे निश्चित करून विकसित करणे, झाडांची संख्या बघून रस्तेबांधणीचे नियाेजन करणे, याेग्य ठिकाणी याेग्य अाकारातील वाहतूक बेट बांधणे, झेब्रा क्राॅसिंग करणे, रम्बलर्स (गतिराेधकाचा प्रकार) उभारणे ही सर्व कामे महापालिकेची अाहे अाणि या कामांचे नियाेजन करणे अाणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेच्या अखत्यारितील ट्रॅफिक सेलची असते. दुर्दैवाने नाशिक शहरात अाजवर ट्रॅफिक सेलच अस्तित्वात अालेला नाही. 

विशेष म्हणजे तत्कालीन प्रधान सचिव बेंजामीन यांनीही ट्रॅफिक सेलच्या निर्मितीसाठी पालिका अायुक्तांना अादेशित केले हाेते. मात्र त्याकडेही संबंधित अायुक्तांनी दुर्लक्ष केले. ट्रॅफिक सेलच्या मागणीसाठी वाहतुकीसाठी काम करणाऱ्या नाशिक फर्स्टने वारंवार पाठपुरावा केला अाहे. तसेच दिव्य मराठी देखील ट्रॅफिक सेलच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करीत अाहे. काही दिवसांपुर्वीच महापालिकेचे पदाधिकारी, पाेलिस अायुक्त संबंधित तज्ज्ञांची ‘दिव्य मराठी’ ने विशेष बैठक घेऊन वाहतुकीच्या समस्या साेडविण्यासाठी चर्चा करण्यात अाली अाहे. यात महापाैर रंजना भानसी यांनी ट्रॅफिक सेलची निर्मिती करण्याचे प्रशासनाला अादेशित केले हाेते. 

रस्ते डिझाइनसाठी कन्सल्टंट हवा.. 
महापालिकेतील ट्रॅफिक सेलसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती हाेणे गरजेचे अाहे. त्यासाठी सरकारचे काही निकषदेखील अाहेत. मात्र अायुक्तांनी अापल्या अंदाजपत्रकात रस्ते डिझाइनसाठी कन्सल्टंटची नियुक्ती करण्याची तरतूद केली अाहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला अाहे. 

स्वतंत्र अधिकाऱ्याचीच नियुक्ती व्हावी 
- महापालिकेत ट्रॅफिकसेलची निर्मिती करावी, असे अादेश राज्य सरकारने यापूर्वीच दिले अाहेत. मात्र, त्यानंतर अालेल्या अायुक्तांच्या उदासीनतेमुळे ट्रॅफिक सेलची निर्मिती हाेऊ शकली नाही. यंदाच्या अायुक्तांनी मात्र ट्रॅफिक सेलची निर्मिती करण्याची घाेषणा करुन वाहतुकीची समस्या साेडविण्यासाठी पाऊल उचलले अाहे. या घाेषणेचे अाम्ही स्वागतच करताे. परंतु, नियमानुसार या सेलचा अधिकारी हा टाऊन प्लॅनिंग विषयात एम.टेक झालेला असावा. अशा अधिकाऱ्याच्या नियुक्तीस परवानगी घेण्यात अाली अाहे का हे बघावे लागेल. अशा अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यास स्ट्रिट डिझाइनसाठी कन्सल्टंट नेमण्याची गरजच भासणार नाही.
-अभय कुलकर्णी, अध्यक्ष, नाशिक फर्स्ट
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...