आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: भगूरला स्वच्छतेबद्दल एक काेटीचे पारिताेषिक, नाशिक विभागात सर्वाधिक स्वच्छ नगरपरिषद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून पारितोषिक स्वीकारताना भगूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर. - Divya Marathi
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून पारितोषिक स्वीकारताना भगूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर.
देवळाली कॅम्प - स्वच्छभारत अभियानात नाशिक जिल्ह्यातील भगूर नगरपरिषदेला केंद्र शासनाचे कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले अाहे. याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी भगूरच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांचा स्वच्छ भारत अभियानाचे प्रमाणपत्र देऊन शासकीय सत्कार करण्यात आला. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील भगूर, त्र्यंबक, येवला, सिन्नर, इगतपुरी, मनमाड, नांदगाव, सटाणा नगरपरिषद पेठ, निफाड, चांदवड, दिंडोरी, देवळा, कळवण नगरपंचायत यांच्यासह अशा एकूण १९ नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद पंचायत असून, त्यापैकी भगूर नगरपरिषदेला टप्प्यातील पाहणी अहवालात पहिला क्रमांकावर आल्याने केंद्र शासनाचे पाठक यांनी भगूर नगरपरिषदेला भेट देऊन भगूर गावातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी भगूरमधील रस्ते, दारणा पाणीपुरवठा केंद्र, दारणा नदी पात्र, सार्वजनिक शौचालय, गृह शौचालय, कचरा डेपो, आठवडे बाजार, दशक्रिया विधी घाट, सावरकर उद्यान, सावरकर स्मारक येथे पाहणी केली. ग्रामस्थ, नगरसेवक, शाळांतील विद्यार्थी यांच्या मुलाखती घेतल्या त्यातील माहितीच्या अाधारे तसा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला.

त्यानुसार केंद्र सरकारने भगूर नगरपरिषदेस कोटीचे प्रथम पारितोषिक जाहीर करून त्यातील पहिल्या टप्प्यात जानेवारी २०१७ मध्ये नगरपरिषदेच्या खात्यावर ३० लाख रुपये वर्ग केले. उर्वरित ७० लाख रुपयांची रक्कम पुढील टप्प्यात मिळणार अाहे. स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानात भगूर नगरपरिषदेला पहिला क्रमांक मिळाल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी भगूरच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांचा गौरवपत्र देऊन सत्कार केला. यावेळी नांदूरकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भगूरच्या नगराध्यक्ष अनिता करंजकर, नगरसेवक, नगरसेविका, भगूर नगर परिषद कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सावरकर फेसबुक समूहाचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक आणि नागरिकांनी सहभागी होऊन स्वच्छ भारत अभियानात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. 
 
नाशिक विभागात सर्वाधिक स्वच्छ नगरपरिषद 
यापूर्वीहीभगूर नगरपरिषदेला तीन वेळा राज्य शासनाकडून प्रथम दाेन वेळा द्वितीय क्रमांकाचे संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत बक्षीस मिळाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...