आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वच्छ सुंदर नाशिक’चा बुरखा नाशिककरांनीच टराटरा फाडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेट्यवधीरूपये खर्च करून शहरापेक्षा ठेकेदारांच्या स्वारस्यात रमणाऱ्या अाणि अस्वच्छतेवर पांघरूण टाकून स्वच्छ सुंदर नाशिकचा टेंभा मिरवणाऱ्या महापालिकेच्या अाराेग्य विभागाचा बुरखा नाशिककरांनीच फाडला असून केंद्राच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिककरांनी घंटागाडीपासून तर शहर अस्वच्छतेशी संबधित प्रश्नांना राेखठाेक उत्तर दिल्यामुळे सहाशेपैकी २७७ म्हणजेच जेमतेम ४५ टक्के गुण पडल्याचे समाेर अाले अाहेे. परिणामी १५१ व्या क्रमांकावर नाशिकची घसरण झाली असून नाशिककरांनीच स्वच्छतेबाबत खाेटे दावे करणाऱ्या अाराेग्य विभागाचे पितळ उघडे पाडले अाहे. 
 

केंद्र शासनाने पाचशे शहरांमधून स्वच्छ काेण याबाबत नुकताच सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. यात गतवेळी ३१ व्या क्रमांकावर असलेल्या नाशिक शहराची १५१ क्रमांकावर घसरण झाल्यामुळे नेमके जबाबदार काेण वा कारणे काय याबाबत उत्सुकता वाढली हाेती. या पार्श्वभूमीवरमहापाैर रंजना भानसी यांनी अाराेग्यधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक धक्कादायक बाबीवर प्रकाश पडला. दाेन हजार गुणांपैकी महापालिकेला ११०० गुण पडले असून त्यात शहरात खराेखरच स्वच्छता हाेते का, घंटागाडी वेळेवर येते का, कचरा कुंडी वा कचरा पेटी असते का याबाबत केंद्र शासनाच्या समितीने नाशिककरांना दूरध्वनीद्वारे विचारणा केली. महापालिकेच्या अाराेग्य विभागाने दहा हजार नागरिकांचे भ्रमणध्वनी दिले हाेते. त्यांना विचारल्यानंतर बहुतांश नाशिककरांनी अस्वच्छता अनियमित घंटागाडीचा भांडाफाेड केला. परिणामी, महापालिकेला सहाशेपैकी जेमतेम २७७ म्हणजेच ४५ टक्के गुण पडले. याव्यतिरिक्त शहराची सार्वजनिक स्वच्छतेबाबत ९०० पैकी ५३७ गुण पडले असून सार्वजनिक महत्त्वाच्या सरकारी स्थळावरील स्वच्छतेत ५०० पैकी २९१ गुण पडले अाहे. 
 
नाशिक शहराची स्वच्छता यादीत घसरण झाल्यानंतर शिवसेनेने सत्ताधारी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते, गटनेते विलास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, पंतप्रधानांच्या अावडत्या याेजनेत नाशिक नापास हाेण्याची बाब ही माेठी नामुष्की असल्याची टिका केली. केंद्र राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची त्वरीत भरती करा, अास्थापना खर्चाचे कारण दाखवू नका, अाजघडीला लाड समिती शिफारसीनुसार ३७०० कर्मचाऱ्यांची गरज असून पालिकेच्या अास्थापनेवर १९०० कर्मचारी दिसतात. प्रत्यक्षात १४०० च्या अासपास कर्मचारी असून शहर स्वच्छ करायचे असेल तर ठेकेदारांवर कारवाईची हिमंत दाखवा, काेणाची गय करू नका असा इशारा दिला. मुख्य म्हणजे, अाराेग्यधिकाऱ्यांचे कामकाज असमाधानकारक असून त्यांची मुदत संपली असल्यामुळे त्यांना शासन सेवेचा रस्ता दाखवा असेही सुनावले. 
 
 
पंतप्रधाननरेंद्र माेदी यांच्या अावडीच्या विषयात नाशिक महापालिका नापास झाल्यानंतर महापाैर रंजना भानसी यांनी अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांची चांगलीच कानउघाडणी करीत माेठे रस्ते राेजच स्वच्छ झाले पाहिजे शहरातील स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी अाराेग्यधिकाऱ्यांनी सकाळी फिरून स्वत:च लक्ष ठेवले पाहिजे, अशी तंबी दिली. 
भानसी यांच्या दालनात अाराेग्यधिकारी, स्वच्छता निरीक्षकांची बैठक झाली. त्यात अाराेग्य विभागाच्या कारभाराचा पंचनामाच करण्यात अाला. महापाैर म्हणाल्या की, घंटागाड्यांमध्येच अाेला सुका कचरा वेगळा हाेत नसेल तर लाेकांना बाेलून काय हाेणार अाहे. ठेकेदारांना तत्काळ अादेश देऊन कचरा वेगळा करा. शहरातील माेठे रस्ते अस्वच्छ असून सफाई कर्मचारी संख्या कमी असली तरी, अाहे ते काय करतात याकडे लक्ष द्या. त्यासाठी सकाळी उठून तुम्ही शहरात स्वत:च फिरले पाहिजे, असेही ठणकावले. उपमहापाैर प्रथमेश गिते यांनी घंटागाडीत अाेला कचरा अधिक येताे तर त्यासाठी जागा कमी सुक्या कचऱ्यासाठी अधिक का, असा प्रश्न करीत अाराेग्यधिकाऱ्यांनाकाेंडीत पकडले. मात्र अाराेग्याधिकाऱ्यांनी अाेल्या कचऱ्यासाठी माेठ्या पिशव्यांची शक्कल लढवल्याचे सांगत गुंगारा दिला. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी जे सफाई कर्मचारी काम करीत नसतील, त्यांना घरी पाठवा असेही सुनावले. काेणाची गय करू नका असेही अादेश दिले. भाजप गटनेते संभाजी माेरुस्कर, उद्धव निमसे यांनी सत्ताधारी भाजप म्हणून शहर स्वच्छ करण्यासाठी काय मदत हवी असे सांगत प्रशासनाने अावश्यक साधन सामुग्रीबाबतही प्रस्ताव द्यावे असे सांगितले. 

{ लाेकसंख्येप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या नाही 
{ खराब उद्यान, भुयारी गटारीचे तीनतेरा, गाेदावरी प्रदुषणाकडे दुर्लक्ष, कचरावेचकांची कमी संख्या 
{ कचरा पेट्यांच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष 
{ अस्वच्छ रेल्वे स्थानक, बस स्टॅण्ड 
{ अाेला सुका कचरा विलगीकरणाकडे दुर्लक्ष 
{ हाॅटेल्स, माॅल्ससारख्या माेठ्या ठिकाणी कंपाेस्ट खत प्रकल्पाची कमतरता 
बातम्या आणखी आहेत...