आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक रोड: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सात दुचाकी जप्त, दाेघे ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चोरलेल्या सात दुचाकी नाशिकरोड पोलिसांनी केल्या जप्त. - Divya Marathi
दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चोरलेल्या सात दुचाकी नाशिकरोड पोलिसांनी केल्या जप्त.
नाशिक रोड - सुस्थितीतील बाजारात चांगली किंमत असलेल्या दुचाकी चोरून त्या विकणाऱ्या जेलरोड येथील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख रुपयांच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. 
याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळील देवी चौकात दोन युवक उभे असून, त्यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची गुप्त वार्ता प्रकाश आरोटे यांना मिळाली. 
 
सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश मजगर, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड सहकाऱ्यांनी विनय रमेश हिवाळे (रा. नील आकाश सोसायटी, वीर सावरकरनगर) अनंत राजेंद्र सोनवणे (रा. मुरलीधर अपार्टमेंट, वसंत विहार) यांच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे देवळाली कॅम्प, उपनगर, आडगाव येथून सात दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. ते दोघेही शहरातील नामांकित महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. दुचाकी चोरीला गेलेेल्या नागरिकांनी दुचाकी या कारवाईबद्दल नाशिकरोड पोलिसांचे कौतुक केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...