आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांत अतिरिक्त सुरक्षेची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डिसेंबर-जानेवारीहा महिना काही महाविद्यालयांमध्ये जरा कटकटीचाच असताे, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी केली अाहे.
महाविद्यालयांमध्ये हा डिसेंबर महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात जास्त घडामोडींचा असतो. या काळामध्ये विद्यार्थ्यांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. महाविद्यालयीन प्रांगणामध्ये फिरताना बाहेरील तरुणांचा महाविद्यालयात या काळात वावर वाढलेला असतो, या गोष्टीमुळे प्रामुख्याने ही मागणी केली गेली आहे.

महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलन, डेज् आणि वार्षिक महोत्सवांचे आयोजन या काळामध्ये केले जाते. त्यामुळे बाहेरील तरुणांचा महाविद्यालयीन परिसरामध्ये वावर वाढलेला असतो. यामुळे त्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनाही महाविद्यालयातला वावर अवघड होतो. असे असताना विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे येथील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. महाविद्यालयामध्ये एरवी विद्यार्थ्यांचे आयकार्ड तपासले जातात. त्यानंतर मुलांना प्रवेश दिला जातो, मात्र यावर फक्त साध्याच विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासले जातात, अशी तक्रार केली गेली आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांचे अाेळखपत्र तपासले जात नाही. सुरक्षारक्षकांच्या ओळखीचे तरुण त्यांच्याशी बोलत महाविद्यालयात प्रवेश करतात. हेच तरुण महाविद्यालयात पार्क केलेल्या गाड्यांवरही बसलेले असतात, मुलींना गाडी पार्किंगमधून काढण्यासाठी देखील यामुळे अडचण येते. पुन्हा तिथूनच ते सुरक्षारक्षकाशीही गप्पा मारतात. मुलींची छेडछाडही करतात.

महाविद्यालयाला एकापेक्षा जास्त प्रवेशद्वारे आहेत, हा प्रश्न मुख्यत: कॉलेजरोडवरील महाविद्यालयांत उद््भवतो. दुपारच्या वेळात जेव्हा महाविद्यालये सुटण्याची वेळ असते तेव्हा या प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक हजर नसतात. याचाच फायदा बाहेरचे तरुण घेतात. याच काळात बाहेरून तरुण महाविद्यालयात प्रवेश करून संध्याकाळपर्यंत फिरत असतात. बाहेरून येणारे विद्यार्थी भीतीचे वातावरण तयार करतात असेही मुलांनी म्हटले आहे. या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यावर भर द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...