आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटेपर्यंत खल; काँग्रेसच्या पदरी 56 जागा, पक्ष कार्यालयाला ठाेकले कुलूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रवादीशी अाघाडी करण्याचे प्रयत्न अखेरच्या क्षणापर्यंत कायम ठेवत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत बैठकीत सहभागी हाेत काँग्रेसने अाघाडी तर मान्य केली. मात्र, ६१ जागांसाठी वाटाघाटी करत असल्याचा दावा करताना प्रत्यक्षात ५६ जागाच पदरात पाडून घेतल्या. दरम्यान, काँग्रेसने त्यांची पक्षतिकिटे विकल्याचा अाराेप करीत पंचवटीतील उमेदवारांनी काँग्रेस कमिटी कार्यालयास कुलूप ठाेकल्याने ताे काँग्रेसींच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला. 
 
काँग्रेसकडे असलेल्या इच्छुकांमधून ६१ जागा लढवण्याचे काँग्रेसने निश्चित केले हाेते. त्यात राष्ट्रवादीशी अाघाडी करताना काँग्रेसने राष्ट्रवादीकडून १२ क्रमांकाचा प्रभाग पूर्णपणे अापल्याच पक्षासाठी मिळवला. त्या प्रभागात काँग्रेसकडून शैलेश कुटे, डाॅ. हेमलता पाटील, समीर कांबळे अाणि वर्षा तेजाळे असे सबकुछ काँग्रेस असे चित्र राहणार अाहे. 
 
तर, १४ क्रमांकाच्या प्रभागात शेख शहानूर बशीर या एकमेव महिला उमेदवाराला तिकीट देतानाच काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यासह राष्ट्रवादीने नाराजीचा सूर लावला. त्यामुळे या प्रभागात काँग्रेसचा केवळ तर राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने या प्रभागात काँग्रेस - राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत हाेण्याची शक्यता अाहे. तर, प्रभाग मध्ये विमल पाटील यांनाच उमेदवारी देऊन काँग्रेसने अन्य तीन जागा मित्रपक्षाला दिल्या अाहेत. काँग्रेसने त्यांच्या वाट्यातील जागांपैकी जागा या कवाडे गटाला दिल्या अाहेत. 
 
काँग्रेसचे तिकीट वाटप हाॅटेलमध्ये : काँग्रेसची खलबते गुरुवारपासून पुणे राेडवरील ज्या हाॅटेलमध्ये सुरू हाेती त्याच हाॅटेलमध्ये काँग्रेसचे तिकीटवाटप शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत सुरूच हाेते. ज्या इच्छुकाचे तिकीट फायनल झाले, त्याला हाॅटेलवर बाेलावून काँग्रेसचा एबी फाॅर्म देऊन अर्ज भरण्यास रवाना करण्यात अाले. 
 
काँग्रेस कार्यकर्ते पांडुरंग बाेडके हे त्यांच्या पत्नीसाठी प्रभाग मध्ये तिकिटासाठी इच्छुक हाेते. मात्र, तिथे काँग्रेसने एकच महिला जागेचे तिकीट देऊन अन्य जागा राष्ट्रवादीला साेडल्या. ही बाब समजताच बाेडके यांनी पक्षकार्यालय गाठले. मात्र, तिथे प्रमुख पदाधिकारी नसल्याने संतप्त बाेडकेंनी पक्ष कार्यालयाला कुलूप ठाेकले. दरम्यान, बाेडके यांनी शहराध्यक्षांवर पैसे खाऊन तिकिटे विकल्याचाही अाराेप केला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...