आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सूत जुळले, नाशिक महापालिका निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - नाशिक महापालिकेतील आघाडीदेखील तुटते की काय अशा शक्यतेपर्यंत ताणल्या गेल्यानंतर अखेरीस बुधवारी मध्यरात्री काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
 
प्रारंभी प्रभागांतील गुंता सोडविल्यानंतर केवळ प्रभाग क्रमांक १२ मधील महिलांच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील पेच कायम होता. परंतु, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी माघार घेण्याचे मान्य करत राष्ट्रवादीला पुढे चाल देण्यास संमती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मातोश्री नगरसेविका छाया ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आघाडीबाबत आठवडाभर सुरू असलेला घोळ संपुष्टात आला असून, सर्व उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली जाणार आहे. नाशकात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा पेच सोडविण्यात आला. 
 
६१-६१ जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी रात्री माहिती देण्याऐवजी गुरुवारी सकाळी आम्ही सकारात्मक निर्णय जाहीर करू असे सांगितले.
 
तरी धोका कायम 

हेमलतापाटील यांच्या जागेवर ठाकरे यांना चाल दिली असली तरी पाटील यांच्या संभाव्य अपक्ष उमेदवारीला काँग्रेस थांबविण्यासाठी कितपत पुढाकार घेतो हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. याच प्रभाग क्रमांक १२ मध्ये विद्यमान नगरसेविका उषा आहिरे यांच्या रुपानेही एका जागेची राष्ट्रवादीकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे पाटील यांचा प्रश्न सुटला असला तरी राष्ट्रवादीच्या या एका जागेबाबत सध्या निर्णय झालेला नाही. 
 
याव्यतिरिक्त प्रभाग १६ मधील एका जागेवरुनही दोन्ही काँग्रेसमधील बेबनाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीचे सूत जुळले असले तरी ते पक्के होणार की नाही याबाबत उत्सुकता कायम आहे.