आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला पुन्हा ‘जाेर का झटका’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजप-शिवसेनालाटेचा फटका काँग्रेसलाही बसत असून, रविवारी (दि. ११) काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘वसंतस्मृती’ कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. गटनेतेपद अाणि स्थायी समितीचे सदस्यपद भूषविलेले गांगुर्डे हे पश्चिम प्रभाग समितीचे विद्यमान सभापती अाहेत. अाजवर त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले हाेते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अाणि शिवसेनेत जाेरदार ‘अावक’ सुरू अाहे. तर दुसरीकडे मनसे, राष्ट्रवादी अाणि काँग्रेसमध्ये ‘जावक’ सुरू अाहे. अाजवर मनसेचे सर्वाधिक नगरसेवक अन्य पक्षात गेले असून, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर लागताे. दीड वर्षापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपकडून निवडून अाले हाेते. तर, त्यांची पत्नी नगरसेविका लता पाटील यांनीदेखील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय, नगरसेवक कन्हय्या साळवे वैशाली भागवत यांनीही काँग्रेसला साेडचिठ्ठी दिली अाहे. हीच मालिका कायम ठेवत नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला माेठा धक्का बसणार असल्याचे बाेलले जात अाहे.

यांनीही केला भाजपत प्रवेश : गांगुर्डेयांच्यासमवेत भास्करराव काठे, बाळासाहेब घोरपडे, रमेश पवार, रवींद्र गांगुर्डे, सोनवणे आदींनी, शिवसेनेतून प्रभाकर पाळदे, चंद्रकांत लासुरे, सचिन पाटील, भूषण पाटील, योगेश शिंदे, दिनेश बोरसे, योगेश अंधारे, पवन पवार, सतीश शिंदे, निखिल सावकार, अमित पगार, किरण शिंदे, तसेच मनसेतून एकनाथ उबाळे, शिवाजी नामदेव जाधव, राजाभाऊ जाधव, सुरेखा पेखळे, समाधान जाधव, शंकर जाधव, उत्तम जाधव, राजेंद्र डावरे, तसेच अनिल बेग, फारूक भाई, दीपक जाधव, बाळू जाधव, संदीप जाधव आदींनी भाजपात प्रवेश केला.

समीकरणे बदलणार? : गांगुर्डेयांची प्रभाग क्रमांक १२ मध्ये दावेदारी हाेती. त्यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक उत्तम कांबळे यांचे पुत्र जाॅय कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या माताेश्री नगरसेविका छाया ठाकरे, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका याेगिता अाहेर, माजी नगरसेविका डाॅ. हेमलता पाटील, प्रज्ञा राजू अाहेर अादी इच्छुक या प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक हाेते. मात्र, गांगुर्डेंनी काँग्रेसला साेडचिठ्ठी दिल्याने त्याचा फटका संपूर्ण पॅनलला बसण्याची शक्यता अाहे. त्यांच्या प्रवेशाने अन्य उमेदवारही पक्षांतराचा विचार करीत अाहेत. यात एक इच्छुक उमेदवार सेनेच्या संपर्कात असल्याचे समजते. हा उमेदवार काँग्रेसच्या गाेटातून निसटला तर संपूर्ण पॅनलला झटका बसणे शक्य अाहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही माेजक्या सक्षम पॅनलपैकी प्रभाग १२ चे पॅनल हाेते. दुसरीकडे भाजपकडून माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांची पत्नी ऊर्मिला सावजी, सुरेश पाटील, गिरीश पालवे, प्रकाश दीक्षित, गणेश कांबळे यांची पत्नी, डाॅ. वैशाली काळे उमेदवारीसाठी इच्छुक अाहेत.गांगुर्डेंच्या प्रवेशाने हे पॅनलही सक्षम झाले अाहे.

चांगले काम करण्याची संधी मिळेल
^काँग्रेसमधून नाराज हाेऊन मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. पंतप्रधान माेदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या विचारसरणीने प्रभावित हाेऊन मी या पक्षात प्रवेश केला अाहे. त्यातून चांगले काम करण्याची संधी मिळेल, अशी खात्री अाहे. -शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक

त्यांना उमेदवारी देणे अडचणीचेच हाेते
^महात्मानगरमधून नगरसेविका छाया ठाकरे इच्छुक अाहेत. त्यामुळे गांगुर्डे यांना या भागातून उमेदवारी देणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे झाले हाेते. - शरद अाहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

अाता मतदारच धडा शिकवतील
^पक्षाने अाजवर महत्त्वाची सर्वच पदे दिलेली असतानाही शिवाजी गांगुर्डे यांनी गद्दारी केली अाहे. त्यामुळे मतदारच त्यांना अाता निवडणुकीतच धडा शिकवतील. -अाकाश छाजेड, माजी शहराध्यक्ष, काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...