आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरिक्त एफएसअायद्वारे कपाटे हाेणार नियमित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या दाेन वर्षांपासून केवळ विकसकच नाही, तर सर्वसामान्य घर खरेदीधारकांना कैचीत पकडणाऱ्या सहा हजारांहून अधिक इमारतींतील वादग्रस्त कपाट क्षेत्राला नियमित करण्यासाठी अखेरीस नवीन विकास अाराखड्यातील विकास नियंत्रण नियमावलीत अतिरिक्त एफएसअाय देण्याचा ताेडगा पुढे अाला अाहे. भाजपचे तिन्ही अामदार, बांधकाम क्षेत्राशी संलग्न तज्ज्ञांच्या पाच संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक निर्णय अाठवडाभरात समाेर येईल, असे अाश्वास्त करीत तसे संकेतही दिले.
महापालिका क्षेत्रात दाेन वर्षांपासून बांधकाम क्षेत्राची काेंडी झाली अाहे. कपाट क्षेत्र नियमित करण्याच्या मुद्यावरून प्रदीर्घकाळ महापालिका विरुद्ध विकसक असा संघर्ष सुरू अाहे. कपाट क्षेत्र नियमितीकरणासाठी विकसकांना दंडाची तयारी दाखवल्यानंतर अधिकारावरून बराच खल झाला. महापालिकेचे तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी अापल्याकडे अधिकार नसल्याचे कारण दाखवत शासनाकडे बाेट दाखवले. शासनाने कपाट क्षेत्र नियमित करण्यासाठी नेमकी किती प्रकरणे याची माहिती मागवली. महापालिकेने सर्वेक्षण करून माहितीही पाठवली. प्रत्यक्षात त्यावरही अनेक महिने निर्णय झाला नाही. एकीकडे कपाट क्षेत्र नियमितीबाबत हाेणारी चालढकल दुसरीकडे नवीन विकास अाराखडा विकास नियमावलीबाबतही उदासीनतेमुळे बांधकाम क्षेत्र ठप्प झाले हाेते. दरम्यान, गेडाम यांच्या बदलीनंतर अायुक्तपदी अालेल्या अभिषेक कृष्णा यांनी शहरातील सर्वांशीच संबंधित हा प्रश्न साेडवण्याचा निर्धार व्यक्त केला. बांधकाम व्यावसायिकच नाही तर सर्वसामान्य नाशिककर, मजूर, बांधकाम साहित्य पुरवठादार या सर्वांची अडचण लक्षात घेत ही प्रकरणे शासनस्तरावरून मंजूर करण्याबाबत प्रयत्न सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अाठवड्यात कपाट क्षेत्राच्या विषयावरून नाशिकमधील तज्ज्ञांनी अायुक्तांना अहवाल सादर केला. त्यात कपाटाची तीव्रता किती प्रमाणात अाहे, हेही लक्षात अाणून दिले. ते १४ टक्के सरासरी उल्लंघन असल्याचे लक्षात अाणून दिल्यावर अायुक्तांनी नगरविकास खात्याला नियमितीकरणाबाबत विनंती केली. दरम्यान, याप्रकरणी भाजपच्या तिन्ही अामदारांनी लक्ष घातले हाेते. त्यानुसार मंगळवारी भाजप अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली क्रेडाई, असाेसिएशन अाॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर, इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ अार्किटेक्ट, इन्स्टिट्यूट अाॅफ इंडियन इंटेरिअर डिझायनर, अार्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर असाेसिएशन अादींच्या पदाधिकाऱ्यांनी करीर यांची भेट घेतली. विकास अाराखड्यातील विकास नियंत्रण नियमावलीत अतिरिक्त एफएसअाय दिल्यास हा प्रश्न निकाली निघेल, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी अाधीच विकास नियमावलीत सकारात्मक तरतूद केल्याचे नगरविकास खात्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. सामासिक अंतरातील कपाटे नियमितीकरणासाठी अायुक्तांना अधिकार देण्याबाबतही चर्चा झाली.

अाठवडाभरात विकास अाराखडा जाहीर हाेणार
विकास अाराखड्यावर केवळ किरकाेळ बदल करून मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अाठवडाभरात विकास अाराखडा जाहीर हाेऊ शकताे. डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जाहीर हाेणार असून, तत्पूर्वी विकास अाराखडा विकास नियंत्रण नियमावली जाहीर हाेईल, असेही स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...