आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद सोमवार: जुलैपासून कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड हाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आपल्या बँक खात्यातील अपेक्षित रक्कम काढण्यासाठी डेबिट अथवा क्रेडिट कार्ड प्रत्यक्ष यंत्रामध्ये टाकावे लागते. मात्र, ते तसे टाकताही आर्थिक व्यवहार त्वरित पूर्ण करू शकणारे कॉन्टॅक्टलेस (संपर्करहित) डेबिट तसेच क्रेडिट कार्ड सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने आणले असून, जुलै महिन्यापासून जिल्ह्यातील ग्राहकांना हे कार्ड उपलब्ध हाेणार आहे. यापूर्वी एचडीएफसी बँकेने या प्रकारचे कार्ड ग्राहकांच्या सोयीसाठी व्यवहारात आणले आहे.
जिल्ह्यातील चारशेहून अधिक एटीएम केंद्रावर हे कार्ड स्वॅप करता येणार आहे. खरेदीसाठी हे कार्ड अधिक उपयुक्त ठरणार आहे. कार्डधारकांना खरेदी सहज सुलभरित्या करता यावी, म्हणून बँकेकडून काही दालने निश्चित केले जाणार असून, त्या दालनांवर विशिष्ट चिन्ह झळकवले जाणार आहे. जेणेकरून हे नवीन डेबिट क्रेडिट कार्ड येथे स्वॅप होऊन याची माहिती ग्राहकांना होऊ शकेल. ‘नियर फिल्ड टेक्नॉलॉजी' (एनएफसी)वर आधारित ‘एसबीआयइनटच' हे कार्ड डेबिट क्रेडिट या दोन्ही प्रकारांत आहे, असे तंत्रज्ञान असलेल्या एटीएम तसेच अन्य मशीन्समध्ये असल्यानंतर ते कार्ड त्याच्याजवळ नेऊन पिन टाकावा लागतो.
अर्ज भरून मिळेल कार्ड
जुलै महिन्यापासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्ये हे कार्ड उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी जवळच्या शाखेत संपर्क साधल्यास या कार्डसाठीचा अर्ज भरून द्यावा लागेल. यासाठी दीडशे रुपये मेंटेनन्स‌् चार्ज आकारण्यात येईल.
काय आहे एनएफसी
कॉन्टॅक्टलेस कार्डामध्ये एनएफसी अर्थात नियर फिल्ड तंत्रज्ञान वापरतात. अशा प्रकारचे कार्ड हे प्रत्यक्ष एटीएम अथवा संबंधित यंत्राजवळ नेल्यानंतर पिन टाकून व्यवहार पूर्ण करता येतो. अशा कार्डाद्वारे गैरवापर होण्याचा धोका कमी आहे. वेळेची बचत सुलभ हाताळणीही होते. पारंपरिक कार्डपेक्षा तीनपट जलद व्यवहार होतात. एरवीचे कार्ड हे संबंधित मशीनमध्ये प्रत्यक्ष टाकावे अथवा सरकवावे (स्वॅप) लागते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांत अशी पद्धत प्रचलित असली तरी सध्या हे तंत्रज्ञान निवडक एटीएम तसेच पीएसटी (पॉइंट ऑफ सेल) वर उपलब्ध आहे. ज्या दालनांसमोर विशिष्ट चिन्ह झळकविले आहे अशा सेवा पुरवठादारांकडे हे कार्ड चालू शकेल.
गैरप्रकारांना आळा बसणार
- कॉन्टॅक्ट डेबिट क्रेडिट कार्डमुळे खाते हॅक होण्यासारख्या गैरप्रकारांना आळा बसणार असून, इतर एटीएम डेबिट कार्डच्या तुलनेत तीन पटीने व्यवहार जलद होणार आहे. जुलैमध्ये हे कार्ड एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होईल.
बाबुलाल बंब, क्षेत्रीय प्रबंधक, एसबीआय
बातम्या आणखी आहेत...