आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतरा वर्षांनंतर... अाजपासून हटणार वादग्रस्त भंगार बाजार, पालिका पाेलिसांची संयुक्त माेहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंगार बाजारात शुक्रवारी पाेलिसांनी संचलन केले. याप्रसंगीचे ड्राेन कॅमेऱ्याद्वारे टिपलेले छायाचित्र - Divya Marathi
भंगार बाजारात शुक्रवारी पाेलिसांनी संचलन केले. याप्रसंगीचे ड्राेन कॅमेऱ्याद्वारे टिपलेले छायाचित्र
नाशिेक -  अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारावर शनिवारी (दि. ७) पहाटे ‘ना भूतो, ना भविष्यति’ अशा पोलिस बंदोबस्तात भंगार बाजारावर बुलडोझर फिरवला जाणार आहे. या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी अतिरिक्त ‘हायटेक’ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तही उपस्थित राहणार अाहेत. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याकरिता वादग्रस्त व्यावसायिकांवर नजर ठेवली जात आहे. या माेहिमेवर ड्राेन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार अाहे. 

भंगार बाजार हटवण्यासाठी पालिका पोलिस प्रशासनाच्या आठ दिवसांपासून संयुक्त बैठकीत रणनीती आखली गेली आहे. व्यावसायिकांना पोलिसांनी नोटीस बजावत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. काही व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेतले असले तरी ही मोहीम राबवली जाणार असल्याने या मोहिमेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह पाेलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ, जयंत बजबळे, सचिन गोरे, मोहन ठाकूर वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, अविनाश सोनवणे यांच्या निगराणीखाली कारवाई हाेईल. मोहिमेसाठी पोलिसांनी बंदोबस्ताची शुक्रवारी रंगीत तालीम केली. अंबड-सातपूर परिसरात सशस्त्र संचलन केले. वसूल करणार अाहे. महापालिकेच्या उचल मर्यादेपेक्षा शिल्लक राहणारे स्क्रॅप साहित्य तेथेच पुनर्वापर करता येणार नाही अशा पद्धतीने दाबून टाकले जाणार अाहे. सायंकाळी वाजेपर्यंत कारवाई सुरूच राहणार अाहे. दरम्यान, महापालिकेची कारवाई लक्षात घेत गेल्या काही दिवसांत बऱ्यापैकी व्यापाऱ्यांनी भंगार साहित्य काढून घेतलेले अाहे, त्यामुळे महापालिकेचा ताण कमी हाेणार अाहे. 
 
उच्चन्यायालयाचा पुन्हा दणका : अखेरचीधडपड म्हणून स्क्रॅप मर्चंट्स असोसिएशनचे मुख्तार अहमद अब्दुल रज्जाक यांनी दाखल केलेला दावा उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. त्यामुळे पालिकेचा मार्ग पूर्णत: माेकळा झाला अाहे. रज्जाक यांनी उच्च न्यायालयात कारवाई थांबविण्याची मागणी केली. अाचारसंहिता तसेच येथील व्यापाऱ्यांच्या राेजीराेटीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, याचिकाकर्ते दातीर यांचे वकील प्रसाद दाणी केतन जोशी यांनी न्यायमूर्ती शंतनू केमकर प्रकाश नाईक यांच्या समोर बाजू मांडताना कारवाईची याेजना तयार असल्याचे पटवून दिले. न्यायालयाच्या अादेशानुसारच महापालिका कारवाई करीत असल्यामुळे कारवाई थांबवणार कशी, असा युक्तिवाद करण्यात अाला. दरम्यान, अडथळा येऊ नये म्हणून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले जाणार असल्याची माहिती दातीर यांनी दिली. 

...यामुळेच पालिका करणार कारवाई : विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे भंगार बाजारावरील कारवाई थांबेल, अशी चर्चा हाेती. प्रत्यक्षात या कारवाईचा मतदारांवर प्रभाव पडण्याचा संबंध नसल्यामुळे महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतला अाहे. मुळात रहिवासी भाग नसल्यामुळे मतदारांशी संबंध नाही. व्यावसायिक हे मतदारांत माेडत नसल्यामुळे कारवाईत अडचण नाही. उच्च न्यायालयाच्या अादेशानुसारच कारवाई हाेत असल्यामुळे निवडणूक अायाेगाच्या हस्तक्षेपाचा संबंधच येत नाही. 
 
साक्रीच्या काँग्रेस अामदाराचा भंगार बाजाराच्या कारवाईला ‘हात’ 
शहरातील गुन्हेगारीचे मूळ असलेल्या भंगार बाजारावर बुलडाेझर फिरवण्यासाठी महापालिका पाेलिस यंत्रणा सज्ज झाली असतानाच, शुक्रवारी दुपारी नाशिकशी दूर-दूरपर्यंत संबंध नसलेल्या धुळ्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अामदार डी. एस. अहिरे यांच्या भंगार बाजाराला अाचारसंहितेच्या कारणास्तव स्थगिती देण्याबाबतच्या पत्राने महापालिकेची दाणादाण उडाली.
 
अहिरे यांच्या पत्राची निवडणूक अायाेगानेही गंभीर दखल घेत पालिकेला याेग्य ती भूमिका घेण्याचे अादेश दिल्यामुळे कारवाई थांबणार काय, असा प्रश्न हाेता. मात्र, उच्च न्यायालयाच्या अादेशानुसारच कारवाई हाेत असल्यामुळे पालिकेने कारवाईची भूमिका ठाम ठेवली. इकडे हा प्रकार अंगाशी येत असल्याचे बघून अहिरे यांनी ‘ताे मी नव्हेच’ अशी भूमिका घेत पीएच्या 
 
 
ड्रोनद्वारे ठेवणार नजर 
अतिक्रमण निर्मूलन माेहीम पाेलिस बंदोबस्तावर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या मोहिमेपूर्वी पोलिस प्रशासनाने भंगार बाजाराचे ड्रोनद्वारे निरीक्षण केले. शनिवारीही ड्रोनद्वारे या ठिकाणी नजर ठेवली जाणार आहे. 
 
हायटेक बंदोबस्त असा 
पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्त, १० निरीक्षक, ३० उपनिरीक्षक आणि ४०० पोलिस कर्मचारी, एसआरपी- तुकडी (१०० कर्मचारी), क्यूआरटी- तुकडी (३० कर्मचारी), आरसीपी-१ तुकडी (३० कर्मचारी). 

अातापर्यंतची सर्वात माेठी कारवाई 
भंगार बाजार हटविण्याची ही कारवाई महापालिकेच्या स्थापनेपासून किंबहुना नाशिक जिल्ह्यातील ही पहिलीच माेठी कारवाई ठरणार अाहे. जवळपास शंभर एकर जागेपैकी २५ ते ३० एकर जागेवर भंगार बाजार अाहे. ही जागा रहिवासी क्षेत्राची अाहे, मात्र येथे व्यावसायिक वापर हाेत असल्यामुळे भंगार बाजार हटवला जात अाहे. 

 
बातम्या आणखी आहेत...