आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ पर्व 2015 : साधूसंतांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा रंगला आखाडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - ग्यानदासयांनी अनेक महंतांच्या मठाच्या जागा विकून मलिदा लाटला. अनेकांना गुंडांकरवी मारहाण केली. त्यांचे पूर्वचरित्र पाहिल्यास त्यांच्यावर कितीतरी गुन्हे दाखल असल्याचे उघड होईल. अशा लोकांमुळेच कुंभमेळ्यात गाेंधळ हाेऊन भाविकांची श्रद्धा डळमळीत हाेते. त्यामुळे चांगल्या कार्यात विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम ग्यानदास यांना मनाेरुग्णांच्या दवाखान्यात भरती करावे, अशा शब्दांत संताप व्यक्त करीत या विषयावर पुन्हा अापल्याला काहीही प्रश्न करू नका, असे अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकारांना सांगितले.

येथील निरंजनी अाखाड्यात नरेंद्रगिरीजी महाराज यांचे शुक्रवारी अागमन झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट महंत ग्यानदास महाराज यांच्यावर ताेफ डागली. धर्माचे अाचार्य, शंकराचार्यांसह सर्वांवर वाट्टेल तसे ताेंडसुख घेणारे कधीही संत हाेऊ शकत नाहीत. ग्यानदास हे काेणत्याही पदावर नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते निरर्थक बडबड करून प्रसिद्धीत राहू पाहत असल्याची टीका नरेंद्रगिरीजी महाराज यांनी केली.

पालकमंत्र्यांनी शब्द मागे घ्यावेत, अन्यथा..
‘साधू-महंतांनीभजन-पूजन करावे, त्यांनी राजकारणात नाक खुपसू नये,’ या पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा नरेंद्रगिरी महाराजांनी चांगलाच समाचार घेतला.या वक्तव्यामुळे साधू-महंत नाराज अाहेत. या मंत्र्यांच्या वरील उच्चपदस्थ व्यक्ती अामच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. अाम्हीही त्यांना असेच सांगू मग? अामचे महामंत्री बाेलले की काँग्रेस सरकार चांगले हाेते, त्याला अर्थच अाहे. कारण यांना काय करायचे तेच समजत नाही. सर्व अाखाड्यांतील कामे अपूर्ण असून, त्याबाबत अाम्ही नाशिकला अाखाडा परिषदेची बैठक घेऊन िनर्णय घेऊ. त्यात पालकमंत्र्यांनी अापले शब्द मागे घेतले नाहीत तर अाम्ही खरेच सर्वांना भजन-पूजन करायला लावू, असा उपरोधिक टोलाही नरेंद्रगिरींनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी करावी पाहणी
उत्तरप्रदेश शासन अाखाड्यांच्या वारंवार भेटी घेऊन नियाेजन करते. मात्र, महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत नरेंद्रगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरमधील दहाही अाखाड्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पदव्या वाटणारे नरेंद्रगिरीच भूमाफिया
नाशिक | गुरुचरणीएका तपाची साधना केल्यानंतर शिष्याला धर्मपरंपरेची सेवा करण्यासाठी पदवी बहाल केली जाते. वैष्णवांमध्ये अनादी काळापासून ही परंपरा चालत आली आहे. मात्र, लाखो रुपये घेऊन काेणालाही महामंडलेश्वर यांसह इतर धार्मिक पदव्यांची खैरातच जणू नरेंद्रगिरी महाराज वाटत अाहेत. भक्तिमार्गाच्या नावाखाली जमिनी बळकावणारे नरेंद्रगिरी हेच खरे भूमाफिया असल्याचा पलटवार निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास महाराज यांनी केला आहे.

अखिल भारतीय श्री पंच निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा आणि दिगंबर या तिन्ही आखाड्यांचे प्रमुख अाणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास हेच असल्याचा पुनरुच्चार करीत राजेंद्रदास महाराजांनी निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्रगिरी यांच्यावर चारित्र्यहीन व्यक्तींकडून लाखाे रुपयांच्या देणग्या स्वीकारून त्यांना महत्त्वाच्या पदव्या बहाल केल्याचा अाराेप केला. भक्तगणांकडून पैसे घेणाऱ्या राधे माँ हिनेदेखील मंडलेश्वर हाेण्यासाठी पैसे दिले हाेेते. या काळ्या पैशातूनच त्यांनी अनेक ठिकाणी जमिनी मिळविल्या. दरम्यान, ‘सच्चितानंद’ हा याच व्यवस्थेचा भाग असून, त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर नरेंद्रगिरींना त्यांची पदवी रद्द करावी लागल्याचा दावा राजेंद्रदास यांनी केला अाहे.

अनादीकाळाची परंपरा
साधू-महंतहे त्यागाचे प्रतीक असतात. आखाडे खालसे अनादी काळापासून गुरू-शिष्य परंपरा अबाधित ठेवत अाहेत. वैष्णवांमध्ये गुरूच्या चरणी बारा वर्षांचा त्याग सेवा केल्यानंतरच मंडलेश्वर, महामंडलेश्वर, आचार्य, जगद््गुरू हाेता येते. पुरातन काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम असल्याचे ते वेगवेगळ्या त्यांनी या वेळी सांगितले.

नौटंकीकरणारे बनले साधू
राधेमाँ यांच्या लिला बाहेर येऊ लागल्या असून, त्या साध्वी आहेत की चित्रपटातील डान्सर, असा प्रश्न पडताे. तर बिअर बार चालविणारा व्यावसायिक सहज साधू होत असेल तर साधू समाजाला हा मोठा धक्काच आहे. नौटंकी करणाऱ्या संधिसाधूंनी धर्माचा बाजार मांडल्याचेही श्री महंत राजेंद्रदास महाराज म्हणाले.

अधर्माचा प्रचार करणाऱ्यांना प्रसिद्धी नको
सिंहस्थकुंभमेळा हा धार्मिक उत्सव आहे. त्यात काही संधिसाधू तसेच स्वयंभू साधूंकडून अधर्माचा प्रचार प्रसार केला जात आहे. त्रिकाल भवंता, राधे माँ या स्वत:ला स्वयंभू साध्वी मानतात. केवळ प्रसिद्धीसाठी धर्माच्या नावाखाली त्यांचा खटाटोप सुरू आहे. मात्र, या विकृत कृत्यांमुळे भाविकांच्या आस्थेलाच धक्का पोहोचताे. संधिसाधूंच्या कृत्यांना माध्यमांतून मिळणारी प्रसिद्धी धर्मपरंपरेवर नकारात्मक परिणाम करीत असल्याची खंत राजेंद्रदास महाराज यांनी व्यक्त केली.

पदवी काढून घेतली, अाता ताे विषय माझ्यासाठी संपला
एखादीव्यक्ती सुधारू पाहत असेल तर धर्मप्रमुख त्याला संधी देऊ शकतात. त्यामुळे गुरुपाैर्णिमेस सचिन दत्ता यांना दीक्षा देऊन साधू परंपरेत अाणले. परंतु, महामंडलेश्वर पदवीवरून उलटसुलट चर्चा झाल्याने ती पदवी काढून घेतल्याचे स्पष्टीकरण देतानाच नरेंद्रगिरीजी महाराज यांनी दत्ता हे साधू म्हणून राहू शकतात, असे स्पष्ट केले. वाल्या काेळीचा दाखला देत व्यक्ती त्याच्या कर्मानुसार उच्चपदावर पाेेहोचू शकताे, असे नमूद करीत ‘त्या’ निर्णयाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अाता हा विषय संपल्याचे ते म्हणाले.
विवादास्पद व्यक्तींचे चारित्र्य तपासावे : महामंत्री
पत्रकार परिषदेत त्रिकाल भवंता, राधे माँ यांच्या पर्वणीतील स्नानाबद्दल विचारले असता महामंत्री हरिगिरी महाराज यांनी त्यांनी भूमिका मांडली. अामच्या अाखाड्यात संन्यासिनी, साधू तसेच महामंडलेश्वर पदावर माताजी अाहेत. मातेची पूजा, अादर भावना ठेवण्याची अामची परंपरा असून, त्यामुळे अाम्ही त्यांना माता संबाेधताे. काेणासही स्नानास पूजा करण्यास बंदी नसल्याने अाम्ही तसे करणार नाही. परंतु, काेणामुळे काही वादविवाद उद््भवला असेल तर त्यांचे संशयास्पद चारित्र्य प्रशासनाने तपासून निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

शंकराचार्यांकडून साईभक्तांचा अपमान
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. श्रीक्षेत्र शिर्डीचे साईबाबा हे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. साईंच्या चरणी आस्थेने लाखो भाविक नतमस्तक हाेत असतात. त्यानंतरही साईबाबांच्या जीवनचरित्राविषयी संभ्रम निर्माण करणारी चुकीची वक्तव्ये करून शंकराचार्यांनी करोडो साईभक्तांचा अपमानच केला आहे. त्यामुळे त्यांना नाशिक अाणि त्र्यंबकेश्वरमध्ये हाेऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येण्यास बंदी घालण्याची गरज असल्याचे मतही श्री महंत राजेंद्रदास महाराज यांनी मांडले.
बातम्या आणखी आहेत...