आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दिवसांनंतर नगरसेवक निधीतील नवीन कामांवर बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशातून नगरसेवक निधीतील कामांचा वापर हाेत असल्याचे लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने १४ डिसेंबरनंतर नगरसेवक निधीतील नवीन कामांवर बंदी घातली अाहे. महापालिकेने त्याचे पालन करण्याचे अादेश खातेप्रमुखांना दिले असून, सहा दिवसांनंतर नवीन विकासकामांना मंजुरी वा कार्यारंभ अादेश देता येणार नाही. विशेष म्हणजे, नगरसेवकांना भूमिपूजनही करणे अवघड झाल्यामुळे धावपळ सुरू झाली अाहे.
महापालिका निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक उमेदवाराची पात्रता लक्षात घेतली जाते. प्रामुख्याने त्याच्या कामाचा अावाका बघून मतदान हाेते. त्यामुळेच स्वेच्छा निधीतून किरकाेळ कामे घेण्याचा नगरसेवकांचा कल असताे. महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तर नगरसेवक निधीतील कामांना वेग येताे. एकप्रकारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचाही हा प्रयत्न असताे. ही बाब लक्षात घेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तीन महिने अाधी किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांना स्वेच्छा निधीचा वापर करता येणार नाही, असे निर्बंध निवडणूक अायाेगाने घालून दिले हाेते. त्यामुळे ५० लाखांचा स्वेच्छा निधी खर्च करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू हाेती. दरम्यान, महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिकची मुदत येत्या १५ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येत असल्यामुळे तीन महिने अाधीच म्हणजे साधारण १४ डिसेंबरनंतर स्वेच्छा निधीतील कामांवर कारवाई करता येणार नाही. ही बाब लक्षात घेत महापालिका अायुक्तांनी त्या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार साधारण १४ डिसेंबरनंतर नगरसेवक निधीतील कामांचा प्रस्ताव अधिकाऱ्यांना मंजूर करता येणार नाही. तसेच, कार्यारंभ अादेश देण्यावरही बंदी अाहे. प्रामुख्याने ज्या कामांचे प्रस्ताव मंजूर असेल केवळ कार्यारंभ अादेश देणे बाकी असेल त्यांनाही मनाई अाहे. दरम्यान, आदेशांचे पालन करता मंजूर हाेणाऱ्या कामांना स्थगिती देण्याबराेबरच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा इशाराही अायुक्तांनी दिला अाहे. त्यामुळे सहा दिवस नगरसेवकांची परीक्षा बघणारे ठरणार अाहे.

नगरसेवकांची वाढली गर्दी
दरम्यान,सहा दिवसांनंतर नगरसेवक निधीतील कामे हाेणार नाही, अशी अायुक्तांची तंबी लक्षात घेत अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना फाेन करून झटपट कामे मार्गी लावा, असा निराेप धाडल्याची चर्चा अाहे. त्यानुसार नगरसेवक हाताेहात फाइल्स घेऊन स्वाक्षरीसाठी धडपडत असल्याचे चित्र अाहे.
बातम्या आणखी आहेत...