आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारदार शस्त्रांनी केले तरुणाचे शिर धडावेगळे; तिघे ताब्यात नागरिक भयभीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मखमलाबादराेड परिसरातील तुळजाभवानीनगर भागात वादातून एका तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १०) रात्री वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी तीन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात अाले अाहे. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. धडावेगळे झालेले शरीर पाहून या ठिकाणी आलेले नागरिक भयभीत झाले होते.
पोलिसांनी त्यांना मिळालेल्या प्रथमदर्शनी माहितीनुसार, तुळजाभवानीनगर भागात पाटाच्या किनारी चार-पाच तरुणांमध्ये वाद झाला. अचानक या तरुणांमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातील संशयितांनी अक्षय नाना घुले (वय १८, रा. उगले चाळ, तुळजाभवानीनगर) या तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याने त्याचे शिर धडावेगळे झाले. या घटनेनंतर हल्लेखाेरांनी पळ काढला. मात्र, परिसरात अंधार असल्याने संशयित काेणत्या दिशेने पळाले, याबाबत परिसरातील नागरिकांनाही अंदाज लागू शकला नाही.

या घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले अाहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पंचवटी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते. संशयितांचीही पाेलिसांकडून चाैकशी सुरू करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...