आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७८१ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेकॉर्डवरील ७८१ समाजकंटकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ मधील १६ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव देण्यात आला असून पाच गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ मध्ये पाच गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ मधील २४६ गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत. सण-उत्सवाच्या काळात प्रथमच इतक्या माेठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले अाहे. 
 
गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. अलीकडच्या काळात शहरामध्ये वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी धडक कारवाई सुरू करण्यात अाली आहे. ती सुरूच ठेवत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या आदेशानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आली. परिमंडळ चे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ चे उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विभाग चे सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, विभाग चे डॉ. राजू भुजबळ, विभाग चे अशोक नखाते, विभाग चे मोहन ठाकूर यांनी ही धडक कारवाई केली आहे. एकूण दहा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. सात टोळ्यांवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आणखी २४६ गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत. 

अशी केली कारवाई 
परिमंडळ मध्ये भद्रकाली-६३, सरकारवाडा-३६, गंगापूर-६२, मुंबईनाका-३०, पंचवटी-४२, आडगाव-३७, म्हसरूळ-४४ असे एकूण ३१४; तर परिमंडळ मध्ये सातपूर-४५, अंबड-१०१, इंदिरानगर-९०, उपनगर-८३, नाशिकरोड-९५, देवळाली कॅम्प-५३ अशा ४६७ संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 

प्रतिबंधक कारवाई सुरूच राहणार 
^परिमंडळमधील सात पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. अाणखी कारवाई होणार आहे. यात काही गुन्हेगारांवर तडीपारीचा कारवाई करण्यात आली आहे. अाणखी कारवाई करण्यात येणार आहे. -लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त परिमंडळ 
बातम्या आणखी आहेत...