आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात ‘खंडवा’विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाविद्यालयीन तरुणांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार खंडवाविरोधात तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. दोन दिवसांपूर्वी खंडवा याला सरकारवाडा पोलिसांनी लासलगावी जेरबंद केले होते. त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत (दि. २८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

नीलेश सोनवणे ऊर्फ खंडवा या सराईत गुन्हेगाराकडून पाठोपाठ लुटमारीचे प्रकार घडत होते. पाच वर्षांत सुमारे शंभर विद्यार्थ्यांना लुटल्याची कबुली खंडवाने पोलिस कोठडीत दिली. खंडवाला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर होते.

वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक निरीक्षक आर. बी. शेगर, उपनिरीक्षक आदीनाथ मोरे, पंकज पळशीकर, प्रवीण वाघमारे, सागर चव्हाण, वसंत पांडव, प्रशांत मरकड, राजू शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितास न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...