आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डेला अंध-अपंगांची सायकल राइड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आपले शहर, दुर्लक्षित राहणारे समाजघटक, पर्यावरण, सायकल आणि स्वतःचे अाराेग्य यांवर प्रेम करण्याचा संदेश देत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नॅशनल असाेसिएशन फाॅर ब्लाइंड अाणि नाशिक इंडस्ट्रीज वेल्फेअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने व्हॅलेंटाइन डे म्हणजे रविवारी (दि. १४) सकाळी वाजता महात्मानगर मैदानापासून ‘डिव्हाइन सायकल राइड’ आयोजित केली अाहे. रॅलीत ६० दृष्टिहीन अाणि बहुविकलांग हौशी सहभागी हाेणार असल्याची माहिती असाेसिएशनचे अध्यक्ष जसपाल बिरदी नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक सायकलिंग कॅपिटल बनविण्याचा नाशिक सायकलिस्टचा प्रयत्न अाहे. याचाच एक भाग म्हणून डिव्हाइन सायकल राइडचे आयोजन आहे. या राइडद्वारे अंध-अपंगांचे सबलीकरण, ध्वनिप्रदूषण रोखणे, हेल्मेट वापर, पर्यावरण संतुलन आणि निरोगी आयुष्यासाठी सायकलचा वापर याबाबत जनजागृती होणार आहे. महात्मानगर क्रिकेट ग्राउंडपासून पारिजातनगर, भोंसला मिलिटरी स्कूल गेट (कॉलेजरोड) असे राइडचे मार्गक्रमण असेल.
राइडसाठी प्रमुख अतिथी म्हणून महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस उपायुक्त विजय पाटील, ज्येष्ठ क्रीडातज्ज्ञ भीष्मराज बाम, डॉ. महाजन बंधू तसेच नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर आदी उपस्थित राहणार आहेत.
नाशिकमधील या अंध-अपंग आणि बहुविकलांग मुलांच्या या साहसी उपक्रमाला समस्त नाशिककरांनी तसेच नाशिकमधील सायकलप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला श्रीकांत जोशी, सुनील खालकर, गोपी मयूर, श्याम पाडेकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्रसाद गर्भे आदी उपस्थित होते. नाशिककर रसकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
गाेल्फ क्लब मैदानावर कायमस्वरूपी सायकल स्टँड
‘पर्यावरणावरप्रेम करा’ असा संदेश देत नाशिक सायकलिस्ट असाेसिएशनच्या वतीने ‘व्हॅलेंटाइन डे’ला (गुरुवार, दिनांक १४ रोजी) गाेल्फ क्लब मैदानावर १२ सायकलींच्या क्षमतेचे स्टँड लावण्यात येणार अाहे. या स्टँडला याेग्य प्रतिसाद मिळाल्यास शहरात ठिकठिकाणी असा उपक्रम राबविण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.