आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टमी, नवमीला रात्री १२ पर्यंत दांडिया रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नवरात्रोत्सवातअष्टमी आणि नवमीला रात्री १२ वाजेपर्यंत दांडिया रास रंगणार असल्याने दांडियाप्रेमींमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये रात्री १० वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी आहे. बहुतांशी ठिकाणी रात्री वाजता दांडिया खेळण्यास सुरुवात होते. या शासन निर्णयामुळे शेवटच्या दोन दिवसांत सुमारे पाच तास दांडिया रंगणार असल्याने दांडियाप्रेमींमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.

नवरात्रोत्सवात दांडिया खेळणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. ठरावीक वेळेमुळे अनेक ठिकाणी दांडियाप्रेमींचा हिरमोड होतो. नवरात्रोत्सवातील शेवटचे दोन दिवस म्हणजे अष्टमी आणि नवमीला रात्री १२ वाजेपर्यंत दांडिया खेळण्यास पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे तरुणांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांशी दांडियाप्रेमी विविध मंडळांमध्ये हजेरी लावतात, तर काही मंडळांकडून आकर्षक बक्षिसांची लयलूट सुरू आहे. अधिक वेळेमुळे दोन दिवसांत विविध मंडळांच्या स्पर्धेत भाग घेता येणार असल्याने दांडिया स्पर्धकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या काळात दांडिया ठिकाणांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी रात्रीच्यावेळी निर्भया पथकांसह साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याकरिता परिमंडळ मध्ये दहा विशेष पथके कार्यरत करण्यात आले आहेत. पोलिस उपआयुक्त एन. अंबिका, श्रीकांत धिवरे यांच्यासह गुन्हे शाखेचे उपआयुक्त अविनाश बारगळ, विशेष शाखेचे सहायक आयुक्त प्रकाश सपकाळे यांची पथकेदेखील नवरात्रोत्सव काळात गस्त करणार आहेत.