आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीला जीपमधून पळवून नेत होते, रस्त्यात विद्यार्थ्यालाही उडवले, जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सटाणा (जि. नाशिक) - तळेगाव दिगर (ता. बागलाण) येथील एका महाविद्यालयीन युवतीला तीन युवक जीपमधून पळवून नेत हाेते. भरधाव गाडी पळवत असताना या गाडीने एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली, त्यात त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी ही घटना घडली. संतप्त गावकऱ्यांनी जीपमधील युवकांना चाेप देत त्यांची गाडी पेटवून दिली. जीपमधील चार युवकांवर सदाेष मनुष्यवध व युवतीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला अाहे.

तळवाडे दिगर येथील दाेन महाविद्यालयीन तरुणी सकाळी साडेसातला रस्त्यावर उभ्या हाेत्या. याच वेळी तीन तरुण जीपमधून अाले. त्यांनी या दाेघींना गाडीत अाेढले. मात्र, त्यापैकी एकीने सुटका करून घेतली. त्यानंतर जीपमधील सतीश बाबूराव वाघ (२८, रा. किकवारी), अनिल पुंजाराम वाघ (२५, साेनज टाकळी, हल्ली मुक्काम नाशिक), विशाल नामदेव देवरे (२५, रा. निताणे) व गाडी चालक रवींद्र उत्तम अहिरे (रा. निताणे) यांनी दुसऱ्या मुलीचे अपहरण करून गाडी दामटली. या युवतीच्या अावाजाने काही शेतकरी गाडीचा पाठलाग करत हाेते. त्यामुळे चालकाने जीप सुसाट दामटली. याच वेळी विष्णू काकुळते यांच्या मळ्याजवळ पायी जाणाऱ्या यज्ञेश रघुनाथ काकुळते (१६) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास जीपने जाेरात धडक दिली. या अपघातात यज्ञेशचा जागीच मृत्यू झाला, तर जीप झाडावर जाऊन अादळली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जीपमधील चारही युवकांना कपडे काढून बेदम मारहाण केली. तसेच जीपही पेटवून दिली. घटनेची माहिती कळताच पाेलिसांनीही तातडीने धाव घेऊन चारही युवकांना ताब्यात घेतले. अपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीचे वडील व मृत यज्ञेशच्या काकांनी या चारही युवकांविराेधात पाेलिसात तक्रार दिली.
बातम्या आणखी आहेत...