आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिफेन्स क्लस्टरसाठी उद्याेग मंत्रालयाकडून विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक मध्येसंरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) उभारण्याकरिता दिंडाेरीत नव्याने संपादित केलेल्या अक्राळे िकंवा येवल्याजवळील चिचाेंडी येथील जागेचा विचार केला जात अाहे. याच अनुषंगाने उद्याेग मंत्रालयाने एमअायडीसीला २५ मे राेजी पत्र पाठवून या जागांवर असा क्लस्टर शक्य अाहे का? याचा अभ्यास अहवाल मागविला अाहे. यामुळे ‘मेक इन नाशिक’च्या पार्श्वभूमीवर डिफेन्स क्लस्टरकरिता सरकारी पातळीवरील हालचाली सुरू झाल्याचे समाेर अाले अाहे. 
 
१९६५ साली केंद्रात उपपंतप्रधान संरक्षणमंत्री म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना घेतले गेले. नाशिककरांनी त्यांना लाेकसभेवर अविराेध निवडून दिले हाेतेे. याची परतफेड म्हणून एचएएलचा प्रकल्प भेट िदला. एचएएल अाणि करन्सी नाेटप्रेस या प्रकल्पानंतर अाजपर्यंत कुठलाच माेठा प्रकल्प केंद्र नाशिकला मिळालेला नाही. धुळे मतदारसंघाला नाशिकचा काही भाग जाेडला अाहे, तेथील खासदार डाॅ. सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्रिपदावर अाहेत. यामुळे नाशिकमध्ये संरक्षण क्लस्टर द्यावा, ज्यात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा समावेश असेल, अशी मागणी संरक्षण राज्यमंत्री या नात्याने हाेत अाहे. 

२४ मेच्या बैठकीत दिले निर्देश 
३०अाणि ३१ मे राेजी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे अायाेजन केले अाहेे. याच पार्श्वभूमीवर उद्याेग मंत्रालयाकडून अाढावा घेतला जात अाहे. २४ मे राेजी उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी अाढावा बैठकीतच या जागांची पाहणी करून अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश िदले हाेते. त्यानुसार २५ मे राेजी एमअायडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाला हे पत्र मिळाले असून, अभ्यास अहवाल निर्मितीचे काम तातडीने सुरू झाले अाहे. 

‘मेक इन ’च्या दृष्टीने तयारी 
^उद्याेग मंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीनुसार अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्राप्त झाले अाहे. एमअायडीसीकडे सध्या दिंडाेरी येथील अाक्राळे अाणि येवला तालुक्यातील चिचाेंडीच्या भूसंपादित झालेल्या जागा उपलब्ध अाहेत. -हेमांगी पाटील, प्रादेशिकअधिकारी, एमअायडीसी 

एमअायडीसीकडील जागा 
अक्राळे (दिंडाेरी) : २०१ हेक्टर
चिचाेंडी(येवला) : १०९ हेक्टर
विंचूरपार्क (निफाड) : ६५ हेक्टर
सायने(मालेगाव) : ८७ हेक्टर
माळेगाव(सिन्नर) : १५० हेक्टर(प्रस्तावित)
 
बातम्या आणखी आहेत...