आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: किमान तपमानात थेट अंश सेल्सिअसने घट, रविवारी किमान 10.4

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - शहरात दोन दिवसांपासून तपमानात घट झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. रविवारी किमान तपमान हे १० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने नाशिककरांना थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागला. रविवारी नाशिक शहरातील हवामान केंद्रात किमान १०.४ तर कमाल २९.९ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. शनिवारी किमान तपमान १६.० अंश होते तर रविवारी थेट १०.४ अंश झाले. 
 
पाकिस्तानमधून पश्चिमी चक्रावात हा जम्मू-काश्मीरच्या दिशेने सरकला. त्यामुळे उत्तर भारतामध्ये पश्चिम दिशेकडील वारे सक्रिय झाल्याने पर्वतीय रांगामध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्याचप्रमाणे गुजरात आणि मध्य प्रदेशाकडून ध्रुवीय वारे वाहण्याचा वेग हा प्रतिताशी ४० ते ४२ किलोमीटर आहे. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये थंडी पडल्याची चर्चा सुरू झाली होती. कपाटातील उबदार कपडे पुन्हा काढावे लागले. तर, अचानक आलेल्या थंडीमुळे शनिवारी रात्री व्यावसायिकांनी व्यवसाय लवकर बंद केले होते. त्यामुळे शहरात रात्री लवकर शुकशुकाट पसरला होता. 
 
अाणखी चार दिवस तपमानात घट राहणार 
गुजरात,मध्य प्रदेशमधून वाऱ्यांची तीव्रता वाढणार असून, १८ मार्चपर्यंत प्रतिताशी ४८ ते ४९ किलोमीटर वाऱ्यांचा वेग जाणार आहे. त्यानंतर पुन्हा २० मार्चपर्यंत ८० ते ९० प्रति किलोमीटरपर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यास श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविला आहे. त्यामुळे तीन ते चार दिवस किमान तपमानात घट राहणार असल्याने नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...