आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा विभागांत सातपूरला अाढळल्या सर्वाधिक डेंग्यूच्या अळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या   सहाही विभागांत जानेवारी ते जूनअखेर ७९ हजार ४५२ घरांना मनपा कर्मचाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली असता ३३५ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या अाढळून अाल्या. यात सातपूर विभागात ११३ घरांमध्ये, तर त्याखालाेखाल नाशिकराेड परिसरातील ८६ घरांचा समावेश अाहे. यात ४० नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
शहरात गतवर्षी डेंग्यूने अनेकांचा बळी घेतला हाेता. त्यामुळे यावर्षी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्याचा प्रयत्न करण्यात अाला. पेस्ट कंट्राेलसह अाराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जानेवारी ते जूनअखेर घरभेटींसह पाण्याचे साठे तपासले अाहेत. ७९ हजार ४५२ घरभेटीत ३३५ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या तर, ६३ हजार ९६१ ठिकाणी पाणीसाठ्यांची तपासणी केली असता ३७५ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या अाढळल्या. सिव्हील सह इंडिया सिक्युरीटी प्रेसला नाेटीस : डेंग्यूचाप्रादुर्भाव राेखण्यासाठी मनपा प्रशासनाने केलेल्या पहाणीत अनेक ठिकाणी डेंग्यूची उत्पादनस्थळे अाढळून अाली. यात सिव्हील हाॅस्पिटलसह नाशिकराेड येथील इंडिया सिक्युरीटी प्रेस एस.टी. महामंडळाच्या अागारांचा समावेश अाहे. या ठिकाणी माेठ्या प्रमाणात भंगार साहित्य टायर्स अाढळून अाल्याने सावधानता घेण्याबाबत त्यांना नाेटीस बजावली अाहे. या साेबतच महापालिकेच्या शाळांना ख‌ासगी शालेय व्यवस्थापनालाही नाेटीस बजावण्यात अाल्याची माहिती महपालिकेचे जीवशास्त्रतज्ज्ञ डाॅ. राहूल गायकवाड यांनी दिली. 

शहराच्या सर्वच भागातील घरांमध्ये अाढळल्या अळ्या 
सातपूर : ११३ 
नाशिकराेड : ८६ 
सिडकाे : ५६ 
नाशिक पूर्व : ४५ 
नाशिक पश्चिम : २१ 
पंचवटी : १४ 
बातम्या आणखी आहेत...