आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ लाखांची शिल्लक; तरी निधी कमतरतेची बाेंब अन् विभागीय क्रीडा संकुलाचा बट्ट्याबाेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातील खेळाडूंना सराव करण्यासाठी तसेच विविध स्पर्धांच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार त्या दर्जाचे हक्काचे मैदान मिळावे यासाठी पंचवटीत २४ कोटी रुपये खर्चून विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आले. या विभागीय क्रीडा संकुलाचे इनडोअर स्टेडियम बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक या खेळांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्यस्थितीत सकाळच्या सत्रातील बॅचच्या माध्यमातून ५५ हजार, तर सायंकाळी खासगी कोचद्वारे घेतल्या जाणाऱ्या बॅचच्या माध्यमातून ६९ हजार रुपये भाडे क्रीडा विभागाला प्राप्त होते. 
 
याबरोबरच जिम्नॅस्टिक, कराटे एरोबिक्स या खेळांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न याचा विचार केल्यास प्रत्येक महिन्याला एक लाख ३० हजार, तसेच स्पर्धांच्या आयोजनातून आणि शासकीय अनुदान एकत्रित करता वर्षासाठी सुमारे ३३ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न प्राप्त होते. या उत्पन्नातून वीजबिल, देखभाल, सुरक्षाव्यवस्था अशा विविध बाबींवर वर्षाला १९ लाख रुपये खर्च केले जातात. अशी स्थिती असतानाही मुंबई -पुण्याच्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाची स्थिती मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. 
 
खर्च अवघा ३९ लाख 
खेळाडूंना प्रोत्साहन आणि उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी पंचवटीत साकारण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलाला वर्षाकाठी ३३ लाखांचे उत्पन्न मिळत असून, १९ लाखांचा खर्च वगळता १४ लाख रुपये शिल्लक राहतात. तरीही निधीच्या कमतरतेची बाेंब मारली जाते. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सरकारच्या उदासीनतेकडेच बाेट दाखवण्याचा प्रकारही सुरू अाहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे, काेट्यवधीच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम अपूर्णावस्थेत असूनही त्याचा वापर सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅकही उखडला अाहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा क्रीडा संकुलाच्या दुर्दशेवर डी. बी. स्टारचा प्रकाश... 
 
{विभागीय क्रीडा संकुलाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग कसा केला जातो. 
}विभागीयक्रीडा संकुलाला प्राप्त होणारे उत्पन्न विभागीय क्रीडाच्या बँक खात्यात जमा केले जाते.त्या निधीतून विभागीय क्रीडा संकुलाची देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते. तसेच काही नवीन साहित्यदेखील खरेदी करायचे असल्यास त्यावरदेखील हा निधी खर्च केला जाताे. 
{मोठ्याप्रमाणावर उत्पन्न असताना विभागीय क्रीडा संकुलाची दुरवस्थाच अाहे. 
}बँकखात्यात असलेल्या पैशातून विभागीय क्रीडा संकुलाची नियमीत दुरुस्ती केली जाते. किरकाेळ काही दुरुस्त्या अाहेत. त्याचे काम सुरूच अाहे. 
{विभागीयक्रीडा संकुल समितीची बैठक नियमित होते का? 
}विभागीयक्रीडा संकुलाच्या दुरुस्ती देखभालीबाबत विभागीय क्रीडा समितीच्या बैठकीतच निर्णय घेतला जातो. या समितीची शेवटची बैठक मार्च महिन्यात पार पडली होती. 
डाॅ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक,क्रीडा युवक सेवा, नाशिक 

क्रीडा विभाग असे आकारते दर 
क्रीडा विभागाकडून बॅटमिंटनच्या एका कोर्टवर खेळण्यासाठी प्रतितास ३००० रुपये खेळांडूकडून आकारले जातात. संकुलातील बॅडमिंटन कोर्टचा विचार करता महिन्याकाठी एक लाखावर उत्पन्न प्राप्त होत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सिंथेटिक ट्रॅकला जॉगिंग ट्रॅकचे रूप... 
सकाळच्या वेळी परिसरातील नागरिक संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवरच जॉगिंग करत असल्याने सिंथेटिक ट्रॅकला जॉगिंग ट्रॅकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणीही या ट्रॅकवर फेऱ्या मारा अशी या ठिकाणाची स्थिती असल्याने खेळाडूंना खरोखर हक्काची जागा मिळतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबरोबरच क्रीडा संकुलात कोपऱ्या-कोपऱ्यात पडलेल्या मद्याच्या बाटल्यांमुळे या संकुलात नेमका कोणता खेळ चालतो याचाही उलगडा होत आहे. 

शुल्क आकारणीबाबतही नियम नाही 
विभागीय क्रीडा संकुलात बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळच्या वेळी साधारण ५० खेळाडू, तर सायंकाळच्या वेळी प्रशिक्षणासाठी ६० खेळाडू येत असतात. सकाळच्या सत्रासाठी महिन्याला प्रति खेळाडू ६०० रुपये आकारले जातात. तर सायंकाळी प्रत्येक खेळाडूंसाठी १८०० रुपये आकारले जातात. त्यातून जमा होणाऱ्या सायंकाळच्या बॅचचे भाडे म्हणून क्रीडा विभागाला ६९ हजार रुपये दिले जात असल्याचे प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले. मात्र, क्रीडा विभागाने खेळाडूंकडून किती शुल्क आकारण्यात यावे याबाबत कोणतेही नियम अथवा संबंधित प्रशिक्षकांना सूचना करण्यात आल्या नसल्याची माहिती डी. बी. स्टारच्या पाहणीत उघड झाली. 
मुंबई-पुण्याच्या धर्तीवर साकारण्यात आलेले विभागीय क्रीडा संकुल साधारणत: नोव्हेंबर २०१४ मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून आजवर या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात आले. त्याबरोबरच शासनाच्या वतीने देखभालीसाठी निधीही देण्यात आला. मात्र, आतापर्यंत या विभागीय क्रीडा संकुलाचे औपचारिक उद‌्घाटन झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे अातातरी उद‌्घाटनाचे साेपस्कार उरकणार का? असा प्रश्न निर्माण झाला अाहे. 

क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधा आणि शासकीय अनुदानापोटी गेल्या दोन आर्थिक वर्षांत क्रीडा संकुल समितीला तब्बल ६७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. त्यातून देखभाल-दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ३९ लाख रुपये खर्च झाले. अर्थात उर्वरित सुमारे २८ लाख रुपये हे समितीच्या खात्यात शिल्लक आहेत. एका बाजूला देखभालीचा पैसा आणि दुसरीकडे दुरवस्था अशा दोन्हीही बाबी पडून असल्याने खेळाडूंना चांगल्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. 
बातम्या आणखी आहेत...