आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहणासाठी सजले साधुग्रामला वाहतूक मार्गात बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकच्यासाधुग्राममधील अाखाडे अाणि खालसे बारा वर्षांच्या काळानंतर पुन्हा एकदा बुधवारी (दि. १९) होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सजले आहेत. सकाळी वाजून १० मिनिटांनी होणाऱ्या या सोहळ्यासाठी आखाडे सज्ज झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रचंड बंदोबस्तासह प्रशासनाने सर्व सज्जता ठेवली असून, मंगळवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास नाशकात त्यांचे आगमन झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा दाखल झाले आहेत.

प्रशासनाकडून ज्या सोहळ्यासाठी गत तीन वर्षांपासून तयारी केली जात असून, त्यातील नांदी अर्थात आखाड्यांचे ध्वजारोहण सकाळी वाजून १० मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे.
साधुग्रामच्या तिन्ही अनी आखाड्यांमधील ध्वजारोहण सोहळ्यासाठीची तयारी मंगळवारी पूर्ण करण्यात आली. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रारंभी ध्वजपूजन होणार असून, त्यानंतर मुहूर्तावर ध्वजारोहण केले जाणार आहे. त्यानंतर जगद‌्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचा उद‌्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

साधुग्रामकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांना पार्किंग थांब्यांवर वाहने पार्क करून पायी कार्यक्रमस्थळाकडे जाण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी कार्यक्रमस्थळाचा बीडीडीएस आणि फोर्स वनच्या पथकाने ताबा घेतला आहे. सर्व परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षेचा भाग म्हणून व्यासपीठावर मोजक्याच मान्यवरांना प्रवेश देण्यात येणार आहे.

असाआहे बंदोबस्त... : पोलिसआयुक्तांसह तीन पोलिस उपआयुक्त, चार सहायक आयुक्त, १० पोलिस निरीक्षक, ४० पोलिस उपनिरीक्षक, ३२० पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त ध्वजारोहण कार्यक्रम ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. साधुग्राममध्ये लावण्यात आलेला अतिरिक्त पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. १२ वर्षांनंतर होणाऱ्या या साेहळ्यासाठी पोलिस यंत्रणेकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून सुमारे आठ हजार पोलिस नाशिकमध्ये बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही रेल्वे सुरक्षा दलाकडून कडेकोट बंदोदस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यातून आठ हजार पोलिस दाखल. पान
हे आहेत थांबे
औैरंगाबादकडूनयेणाऱ्या वाहनांसाठी निलगिरीबाग येथे पार्किंग, धुळे मार्गे येणारी वाहने बिडी कामगार चौफुली, मुंबई आणि नाशिककडून येणाऱ्या भाविकांसाठी मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
हे मार्ग बंद
औरंगाबादरोडते मिर्ची हॉटेल चौफुली, मारुती वेफर्स ते तपाेवन, तपाेवन क्रॉसिंग ते तपाेवन, पंचवटी कॉलेज ते तपोवन हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
हे आहेत पर्यायी मार्ग
मुंबईकडूनयेणारी वाहतूक सरळ धुळेमार्गे बिडी कामगार चौफुली उजव्या बाजूने वळवून इतरत्र जातील. औरंगाबादकडून येणारी वाहतूक निलगिरीबाग बिडी कामगारनगर महामार्गावरून इतरत्र जातील. मुंबईकडे जाणारी वाहतूक टाकळी फाटा मार्गे इतरत्र जाईल. औरंगाबादकडून पुणे, नाशिकसाठी येणारी वाहतूक नांदूरनाका येथून डाव्या बाजूस वळून जेलरोडमार्गे इतरत्र जाईल.
मेटल डिटेक्टरने तपासणी
साधुग्राममधीलआखाड्यांचे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला अाहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहण कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर मशीनने तपासणी करण्यात येऊन आत प्रवेश दिला जाणार आहे. साधुग्राम परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ साधुग्राममधील आखाड्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमाने होत आहे. बुधवार (दि. १९) सकाळी वाजता साधुग्राममध्ये ध्वजारोहण होत आहे. पोलिस दलाकडून साधुग्राममधील कार्यक्रमस्थळ आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी करण्यात आली. पोलिस आयुक्त एस.जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे नियोजन पूर्ण झाले आहे.
साेमवारी रात्री अाणि मंगळवारी सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन अामदार बाळासाहेब सानप यांनी सर्व व्यवस्थेचा अाढावा घेतला. तसेच महापाैर अशाेक मुर्तडक अाणि अाखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनीदेखील सकाळी तिन्ही अनी अाखाड्यांमध्ये जाऊन सर्व सज्जतेची खात्री करून घेतली. पोलिस आणि प्रशासनाकडून साेहळ्यासाठी प्रचंड बंदाेबस्तासह जय्यत तयारी ठेवण्यात आली आहे. सायंकाळपासूनच साधुग्रामकडील रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून, मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ध्वजारोहणासह रामानंदाचार्य प्रवेशद्वाराजवळ कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी साधुग्रामची मंगळवारी पाहणी केली. समवेत आमदार बाळासाहेब सानप मान्यवर.

साधुग्रामच्या प्रवेशद्वाराजवळ होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलिसांनी कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.