आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल बँकिंगसाठी ‘नाशिप्र’चा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी चलनबंदीच्या घेतलेल्या निर्णयाने निर्माण झालेली अस्वस्थता गाेंधळ दूर करण्यासाठी अाता नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेत विद्यार्थ्यंासह पालकांना डिजिटल बँकिंगसाठी प्रवृत्त करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींमार्फत प्रबाेधनाची माेहीम हाती घेण्यात अाली अाहे.
संस्थेच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना साेबत घेऊन डिजिटल बँकिंगच्या जागृतीसाठी आर्थिक साक्षरता मोहीम तीन टप्प्यात राबवून समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा मानस आहे. या उपक्रमांच्या पहिल्या टप्प्यात सनदी लेखापालांचे प्रत्येक शाळेत व्याख्यान होणार अाहे. त्याचबरोबर बँक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक यांना कॅशलेस व्यवहारासाठी असलेल्या उपलब्ध साधनांचा वापर उपयुक्तता याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात उच्च माध्यमिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कॅशलेस व्यवहार साधनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थी प्रत्यक्ष संपर्क करून कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व पटवून देणार आहेत. त्याचबरोबरीने शिक्षकांच्या मदतीने कॅशलेस साधनांचा वापराबाबत जनजागृती करणार आहेत. डिजिटल बँकिंग आणि त्याची उत्पादने, दुकानदार आणि विविध सुविधा पुरवठा करणाऱ्या (उदा. वीजबिल, गॅस, टीव्ही रिचार्ज, मोबाइल रिचार्ज, प्रत्यक्ष मार्केटमध्ये) उत्पादनांचे विद्यार्थी प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. ही मोहीम १५ दिवस चालू असेल. नाशिक शहरासह सिन्नर, इगतपुरी आणि नांदगाव भागात राबविणार आहेत. घरोघरी आणि बाजारात जाऊन या उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. मोहिमेत ठाणे जनता सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा सहभाग आहे. िवशेष म्हणजे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डाॅ. विनायक गोविलकर, हेरंब गोविलकर, नितीन गर्गे, मधुकर जगताप आदी या मोहिमेत मार्गदर्शन करणार आहेत. माेहिमेत सहभागी हाेण्याचे अावाहन संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, श्रीपाद देशपांडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...