आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९४६ शाळा डिजिटल, ११५ आयएसओ मानांकित, ८३७ विद्यार्थी इंग्रजी माध्यम सोडून जि.प. शाळेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा परिषदेच्या तीन हजार ३३८ शाळांपैकी ९४६ शाळा डिजिटल करण्यात अाल्या अाहेत. लाेकप्रतिनिधी समाज सहयाेगातून ११५ शाळांना अायएसअाे मानांकन मिळाले असून, शिक्षकाच्या मदतीने एका वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांना टॅबद्वारे संगणकीय शिक्षण दिले जात अाहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा हाेत असल्याचे बघून जिल्ह्यातील ८३७ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातील शाळांचे शिक्षण साेडून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला अाहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २२ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार शाळांना प्रगत केले जात अाहे. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांच्या मदतीने ९४६ शाळा डिजिटल करण्यात अाल्या अाहेत. यामुळे खेड्यापाड्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक प्राेजेक्टरच्या मदतीने हायटेक दर्जाचे शिक्षण दिले जात अाहे. इतकेच नव्हे, तर अनेक शाळांमध्ये इंटरनेट सुविधाही उपलब्ध करून देण्यात अाल्या अाहेत.

स्वशिस्तीतून मानांकन
गावकुसावर विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांनी स्वशिस्तीतून अायएसअाे मानांकन मिळविले अाहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांसह ग्रामस्थ विद्यार्थ्यांचे याेगदानही माेलाचे ठरत असल्याने अातापर्यंत ११५ शाळांंना अायएसअाे मानांकन मिळाले अाहे.

पांडववाडीच्याविद्यार्थ्यांना टॅबद्वारे शिक्षण
येवला तालुक्यातील पांडववाडी या वस्तीशाळेवर कार्यरत असलेल्या संदीप शेजवळ या शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी १० ते १२ टॅबची व्यवस्था केली अाहे. शालेय वेळेत चार-चार विद्यार्थ्यांचा गट करून त्यांना टॅबद्वारे शिक्षण दिले जात अाहे.

हायटेक शाळांची संख्या
{माेबाइल अॅप्सचा वापर करणाऱ्या शाळा : ४३२
{ब्लाॅग वेबसाइट तयार करणाऱ्या शाळा : २०१
{इंटरनेट सुविधा असलेल्या शाळा : ३२७
{स्वत:चे व्हिडिअाे तयार केलेल्या शाळा : १५९
{स्वयंसेवी संस्थांनी दत्तक घेतलेल्या शाळा : ७२
बातम्या आणखी आहेत...