आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींची सीटी स्कॅन यंत्रे ‘सिव्हिल’ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाच वर्षां पासून जिल्हा शासकीय रुग्णालयामधील सीटी स्कॅन यंत्रणा बंद आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विभागीय संदर्भ रुग्णालयात जावे लागते. गरीब गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणारी ही महत्त्वपूर्ण यंत्रणाच बंद असल्याने रुग्णांची माेठी गैरसाेय हाेत अाहे. रुग्णांची ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाकडून सुमारे दोन कोटी खर्च करून घेतलेली अत्याधुनिक मल्टी सीटी स्कॅन यंत्रणा सिंहस्थ रुग्णालयाच्या एका खोलीत धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आली आहे. विशेष म्हणजे, फक्त ही यंत्रणा बसविण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम शासनाकडून संबंधित ठेकेदाराला दिली गेली नाही म्हणून ही यंत्रणा अद्याप बसविण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नाशिक जिल्ह्यातील दुर्गम अादिवासी भाग, जव्हार परिसर, नगर जिल्ह्यातील अकाेले, राजूर या भागातून रुग्ण येत असतात. गरीब गरजू रुग्णांना सीटी स्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात सुविधा नसल्याने संदर्भ रुग्णालयात किंवा तातडीची गरज असल्यास खासगी रुग्णालयात जावे लागते. जिल्हा शासकीय रुग्णालयामधील सीटी स्कॅन यंत्रणा जुलै २०११ पासून बंद पडली आहे. काही वर्षांपूर्वी सुमारे दीड कोटी रुपयांची सीटी स्कॅन यंत्रणा बसविण्यात अाली हाेती. छातीच्या सीटीस्कॅनसाठी ते हजार रुपये अाकारले जातात.

संपल्याने ती निकामी झाली. यानंतर जिल्हा रुग्णालयात नवीन सीटी स्कॅन यंत्रणा खरेदी करण्यासाठी पाठपुरावा करून या रुग्णालयासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची अत्याधुनिक मल्टी सीटी स्कॅन यंत्रणा खरेदी करण्यात आली. मात्र, ही यंत्रे रुग्णालयात आली, मात्र त्याचे इन्स्टालेशन झाल्याने ही यंत्रे सिंहस्थ रुग्णालयाच्या एका खोलीत धूळखात पडून अाहेत. कोटी रुपये खर्च करून घेण्यात अालेल्या या यंत्रणेचा वापर कधी होणार, याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात जिल्हा शासकीय रुग्णालयातून येणाऱ्या दररोज सुमारे ३० रुग्णांचे सीटी स्कॅन केले जाते. संदर्भ सेवा रुग्णालयात एका पेशंटकडून पोटाच्या सीटी स्कॅनसाठी ७५० रुपये, तर डोक्याच्या सीटी स्कॅनसाठी ५०० रुपये आकारले जातात, तर खासगी ठिकाणी यासाठी अडीच हजार ते साधारणत: सात हजार रुपये आकारले जातात. जिल्हा शासकीय रुग्णालयात कोटी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या या यंत्रणेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्याचा अार्थिक फटका गरीब रुग्णांना बसत अाहे.
किरकोळखर्चामुळे सीटी स्कॅन यंत्रणा पडून :
शासनाकडूनसुमारे दोन कोटी खर्च करून घेतलेली अत्याधुनिक मल्टी सीटी स्कॅन यंत्रणा सिंहस्थ रुग्णालयाच्या एका खोलीत धूळखात पडून अाहे. या यंत्रणेचा रुग्णालयात वापर झाल्यास रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होईल. मात्र, किरकोळ इन्स्टोलमेंट खर्चअभावी सीटी स्कॅन यंत्रणा धूळखात पडून अाहे.
खासगीसेंटरमध्ये जाण्याचा सल्ला :
जिल्हाशासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर सीटी स्कॅन करण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यानंतर संदर्भ सेवा रुग्णालयात जाण्यास सांगितले जातात. मात्र, तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. लवकर करायचे असेल तर खासगी सेंटरमधून स्कॅन करण्यासही सांगितले जात आहे. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून शासनाकडून खरेदी करण्यात आलेली, धूळखात पडून असलेली सीटी स्कॅन यंत्रणा इन्स्टोल करण्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे समोर आले आहे.

अशी आहे आकडेवारी
- कोटींची अत्याधुनिक मल्टी सीटी स्कॅन यंत्रणा पडून
- संदर्भमध्ये सिव्हिलमधून येणारे दररोज सुमारे ३० रुग्णांचे सीटी स्कॅन केले जाते.
- संदर्भ रुग्णालयात दरराेज ५० पेक्षा अधिक रुग्णांचे सीटीस्कॅन केले जाते. त्यातील उर्वरीत २० रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.
- सिव्हिलचे महिन्यांत २५०० सीटी स्कॅन संदर्भमध्ये केले.
- एका पेशंटकडून पोटाच्या सीटी स्कॅनसाठी ७५० रुपये, तर डोक्याच्या सीटी स्कॅनसाठी ५०० रुपये आकारले जातात.
- खासगी रुग्णालयात पाेटाच्या सीटीस्कॅनसाठी हजार पाचशे रुपये, डाेक्याच्या सीटीस्कॅनसाठी साडेतीन हजार रुपये तर
सिव्हिलच्या अावारातील सिंहस्थ रुग्णालयातील कक्षात सीटी स्कॅनची यंत्रे खाेक्यात पडून अाहेत.

इन्स्टालेशन खर्चासाठी पाठपुरावा
शासनाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी शासनाकडून अत्याधुनिक मल्टी सीटी स्कॅन यंत्रणा खरेदी करण्यात आलेली अाहे. मात्र, इन्स्टोलमेंट खर्चअभावी सीटी स्कॅन यंत्रणा पडून अाहे. हा खर्च लवकरच लवकरच मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असून, रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्रणा लवकरच लावण्यात येणार अाहे.- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक
बातम्या आणखी आहेत...