आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे दर्जेदार होऊ द्या किंवा पैसे वसूल करा, जिल्हाधिकारी नाराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी अचानकपणे विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर प्रचंड नाराजी व्यक्त केली. २४ कोटी रुपये खर्च करूनही तेथील सोयीसुविधांची पुरती लागलेली वाट आणि स्वच्छतेबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कामांचाही दर्जा अपेक्षित राखला नसून, बहुतांश कामे अपूर्णच ठेवल्याने संबंधित ठेकेदारांकडून ती पूर्ण अाणि दर्जेदार करा. अन्यथा पैशाची वसुली करा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
पंचवटीतील विजयनगर परिसरात अांतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारलेल्या विभागीय क्रीडा संकुलाला कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित क्रीडाप्रकार तेथे सुरूच झाले नाही. २३ एकर प्रशस्त जागेत हे क्रीडा संकुल असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तेथे अस्वच्छतेचे साम्राज्यच पसरले आहे. सुरक्षेचीही व्यवस्था नसल्याचे जिल्हाधिकारी कुशवाह यांनी अचानक केलेल्या पाहणीत समोर आले. त्यावर त्यांनी लागलीच त्याचे अद्ययावतीकरण झालेच पाहिजे. जी कामे पूर्ण झाली आहे, त्यांचा दर्जा उत्तम नसल्याने ती दर्जेदार करावी. ठेकेदाराकडून ती करून घ्यावी. त्यांनी केल्यास ठेकेदाराकडून वसुली करा. शिवाय सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणारी कामेही अपेक्षानुसार करून घेण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचबरोबर संरक्षक भिंतीसह येथे क्रीडा संकुलास आवश्यक असलेल्या नवीन कुठल्या सोयी अथवा कामे करावयाची आहेत. त्याचा तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांचाही त्वरित आराखडा तयार करा. स्पर्धेस आलेल्या खेळाडूंची निवासाची, भोजनासाठी मेसची, पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचेही आदेश कुशवाह यांनी दिले. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था डीपीडीसीतून केली जाईल. शिवाय आदिवासी विद्यार्थी येथे वसतिगृहावर राहात असल्याने त्यांनाही अद्यावत सुविधांसाठी आदिवासी विकास विभागाच्या निधीतून कोटी रुपयांची व्यवस्था करण्याचाही पर्याय खुला केला, तर तेथील वसतिगृहावर वॉर्डन नेमण्याची त्वरित व्यवस्था करण्याचेही आदेश त्यांनी दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वतंत्र व्यवस्था करा
एकदा कामे झाली तरीही तेथील टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट किंवा अॅरोबिक्स, अॅथलेटिक्स यांची डागडुजी व्हावी. त्यासाठी खेळाडूंसाठी संकुल उघडे करावे. त्यांना अत्याधुनिक सुविधा मिळतील आणि त्यांच्याकडून नोंदणी शुल्क आणि दरमहा शुल्क घेत त्यातूनच डागडुजीची व्यवस्था करण्याचा पर्याय त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

पुन्हा करणार पाहणी
स्वच्छता आणि अपूर्ण कामांची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा जिल्हाधिकारी संकुलाला भेट देणार आहे. त्यात संपूर्ण स्वच्छता झालेली असावी. असे स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शिवाय संपूर्ण क्रीडा संकुलाच्या चारही बाजूंनी उंच झाली लावत हा परिसरही निसर्गरम्य करण्याचा मानस कुशवाह यांनी व्यक्त केला.

विभागीय क्रीडा संकुलाची झालेली दुरवस्था आणि प्रचंड अस्वच्छता
स्वच्छता, अपूर्ण कामे पूर्ती, पूर्ण झालेल्या कामांचे अद्ययावतीकरण, क्रीडा सुविधांचा नियमित वापर, प्रशिक्षकांची नेमणूक, निवास, भोजन आणि सुरक्षेसह इतर सर्वच बाबींची खातरजमा करत, अहवाल तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. त्यास विविध योजनांतून निधी कसा देता येईल, यालाही सकारात्मकता दर्शवली. त्यामुळे अांतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारलेल्या क्रीडा संकुलाला पुन्हा ऊर्जितावस्था येणार असून, इतरही खेळांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतर कुठल्याही जिल्ह्यात असे क्रीडा संकुल नाही
असेशासकीयक्रीडा संकुल मी तरी इतर कुठल्याही जिल्ह्यात पाहिले नाही. तेथे नियमित स्पर्धा व्हाव्यात. शाळांच्याही स्पर्धा घेत नाममात्र शुल्क आकारल्यास डागडुजीसाठी करता येईल. सुविधांसाठी योजनांतून ती साकारण्याचा पर्याय बघू. पण पूर्वीच्या ठेकेदारांकडून कामे नीट करून घेणार अन्यथा वसुली करणार. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...