आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ लकी ड्रॉ सोडत जाहीर, नववर्ष धमाका ऑफरअंतर्गतविक्रेत्यांना मिळाली बक्षिसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक शहरातील वृत्तपत्र विक्रेते बांधवांसाठी ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष धमाका ऑफर या अंकवाढ योजनेच्या सोडतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस (एलईडी टीव्ही) सातपूर येथील विक्रेते संतोष गौड यांना मिळाले. ‘दिव्य मराठी’ कार्यालयामध्ये शुक्रवारी (दि. १२) नाशिक शहर, सिडको, नाशिकरोड सातपूर येथील विक्रेता संघटनेचे पदाधिकारी अाणि विक्रेते बांधवांच्या हस्ते ही साेडत काढण्यात आली.

साेडत कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, युनिट हेड मदनसिंह परदेशी, एसएमडी स्टेट हेड राकेश चतुर्वेदी, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, विनोद पाटील, जयवंत माळी, उमेश जोशी, धनंजय सिन्नरकर, नारायण बैरागी, सिडको शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे, अजय बागुल, देवेन खालकर, कैलास बच्छाव, रवी वाघ, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किशोर सोनवणे, भरत माळवे, हर्षल ठोसर, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर, संदीप शेवाळे, महेश थोरात, राजू अनमोला, सिटी एजन्सीचे बाळकृष्ण नेर, अविनाश आव्हाड आदी उपस्थित होते. भाग्यवान विजेत्यांना लवकरच बक्षीस वाटप केले जाणार अाहे.

सायकल विजेते
दिगंबर उगले - म. गांधी रोड सेंटर
शंकर गुंजाळ - म. गांधी रोड सेंटर
जय भालेराव - नाशिकरोड
विकास रहाडे - नाशिकरोड
विलास वाडेकर - नाशिकरोड

इंडक्शन विजेते
अशोक मानकर - म. गांधी राेड सेंटर
उमेश जोशी - म. गांधी राेड सेंटर
कैलास वाघ - म. गांधी राेड सेंटर
शशिकांत बोरसे - नाशिकरोड
महेश थोरात - सातपूर