आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: स्फोटात कुटुंब गमावलेल्या संतनाला मिळाले अमेरिकन पालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटुंब गमावलेल्या आणि अपंगत्वाचा सामना करणाऱ्या वर्षांच्या संतना या अनाथ बालिकेचे भाग्य येत्या शुक्रवारी दत्तकविधानाने बदलणार आहे. अमेरिकेतील एक जोडपे तिला दत्तक घेणार आहे. स्नेहांकुर दत्तकविधान केंद्राच्या प्रयत्नातून तिचे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. संतनाचे आई-वडील रोजगारासाठी बिहारमधून नाशिकमध्ये आले होते. सातपूर-अंबड लिंकराेडवरील बजरंगनगर येथे दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या या चौकोनी कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला. २७ मे २०१४ रोजी गॅस सिलिंडरच्या स्फोटात संतनाचे आई-वडील आणि भाऊ मरण पावले. पाच वर्षांची संतनाही या स्फोटात ८० टक्के भाजली, मात्र तिला जीवदान मिळाले. 
 
संतनाला जबर जखमा झाल्या असल्याने सुश्रुषेसोबत शस्त्रक्रियेची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नव्हते. ही एक दीर्घकालीन आणि खर्चिक जबाबदारी होती. तिच्या जवळच्या नातेवाइकांनीही तिला सांभाळण्यास पूर्ण नकार दिला होता. अशातच नाशिक बर्न सेंटरच्या डॉ. राहुल शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या उपचारामुळे संतना वाचली. डॉ. शिंदे यांनी रुग्णालयातच संतनाला तीन महिने विनामूल्य सांभाळले. तिचे नक्की पुढे काय करावे, असा प्रश्न डॉ. शिंदे यांना पडला होता. अहमदनगर येथील भाऊ डॉ. राजेंद्र यांना डॉ. राहुल यांनी संतनाबद्दल सांगितले. त्या माध्यमातून संतना स्नेहांकुर या स्नेहालयाच्या दत्तकविधान केंद्रात पोहोचली. स्नेहांकुरने संतनाचे नातेवाइक शोधले. संतनाला ते सांभाळणार असतील तर स्नेहालय स्नेहांकुर तिच्या सर्व वैद्यकीय उपचारांची जबाबदारी घ्यायला तयार असल्याचे त्यांना सांगितले. पण सर्वांनीच नकार दिला. त्यानंतर नगरमधील प्लास्टिक सर्जन डॉ. अजित काळे यांनी तिच्यावर सातत्यपूर्ण शस्त्रक्रिया विनामूल्य करून तिचे जीवन सुसह्य केले. 
अमेरिकेतीलजाेडप्याने घेतले संतनाला दत्तक : संतनालापालक मिळविण्यासाठी मागील अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेतील श्रीमती जस्मीन डेव्हिडसन या औद्योगिक क्षेत्रातील सल्लागार आणि चिन्मय मिशनच्या शिष्या असलेल्या महिलेने संतनाची माहिती घेतली. तिला आपल्या कुटुंबात सामील करण्यासाठी दत्तकविधानाची प्रक्रिया सुरू केली. श्रीमती जस्मीन यांनी आधीच वेगवेगळ्या खंडांमधील अनाथ बेघर झालेली दाेन मुले आणि एक मुलगी दत्तक घेतलेली आहेत. जस्मीन यांनी संतनासाठी हिंदी भाषादेखील शिकली. 
 
संतना 
अमेरिकेतील श्रीमती जस्मीन डेव्हिडसन यांनी संतनाला दत्तक घेतले असून यापूर्वीही खंडांमधील अनाथ बेघर झालेली दाेन मुले आणि एक मुलगी त्यांनी दत्तक घेतलेली आहेत. 

‘दिव्य मराठी’चा पुढाकार, लोकांचाही उत्तम प्रतिसाद 
-संतनालावाचविलेपाहिजे यासाठी दिव्य मराठी’ने ‘नाशिक बर्न्स’साेबत आपली भूमिका पार पाडली. दानशूरांना तिच्या उपचारांसाठी मदतीचे अावाहन केले. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद मिळाला. जाे तिला वाचविण्यास नक्कीच मदतगार ठरला.
-डॉ. राहुल शिंदे 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, उद्या दत्तकविधान साेहळा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...