आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक खर्चासाठी अाॅनलाइन अॅप, शनिवारी मोबाइल अॅपविषयी प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी True Voter या माेबाइल अॅप्लिकेशनचा वापर सक्तीचा करण्यात अाला अाहे. खर्चासंदर्भातील विवरणपत्रे शपथपत्रे या अॅपचा वापर करून कशी भरावीत, यासाठी शनिवारी (दि. ४) छत्रपती शिवाजी टाऊन हाॅलमध्ये दुपारी वाजता प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अायुक्त रवींद्र जगताप यांनी दिली अाहे. 
 
उमेदवारांना अत्यंत साेप्या पद्धतीने दैनंदिन खर्च विहित नमुन्यात भरून डाऊनलाेड करून सादर करणे साेयीस्कर व्हावे यासाठी निवडणूक अायाेगाने True Voter नावाचे माेबाइल अॅप तयार केले अाहे. या अॅपमध्ये नमुना ते असे भाग करण्यात अाले अाहे. नमुना मध्ये दैनंदिन निवडणूक खर्च, नमुना मध्ये एकूण निवडणूक खर्च, नमुना मध्ये शपथपत्र तर शेवटच्या नमुना मध्ये निधीचे स्त्राेत नमूद करण्याची तरतूद अाहे. अॅपद्वारे उमेदवारांना खर्च भरणे डाऊनलाेड करणे खूपच साेपे अाहे. अॅपमुळे उमेदवारांच्या खर्चावर मतदारांना हरकत घेणे, नियंत्रण समितीस खर्चावर शेरे मारणे, स्थानिक स्वराज्य संस्थेस स्टॅण्डर्ड दर भरणे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास हरकतींवर निर्णय घेणे तसेच महापालिकेस वेळ नियमांचे पालन करणाऱ्या उमेदवारांचा अहवाल मिळविणे या सुविधा मिळणार अाहे. या अॅपमुळे उमेदवारांना निवडणूकविषयक बाबींची सुलभ पूर्तता हाेणार अाहे. 

माहितीसाठी सहाय्य कक्ष 
अॅपची माहिती तसेच यातील अडचणी दूर करण्यासाठी दहा कर्मचाऱ्यांचा सहाय्य कक्ष तयार करण्यात अाला अाहे. यासाठी सहायक कक्षात ७४४७४५५८६१ ते ७० असे दहा क्रमांकही कार्यान्वित करण्यात अाले अाहे. अॅपची माहिती जाणून घेण्यासाठी संभाव्य उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे अावाहनही अायुक्त रवींद्र जगताप यांनी केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...