आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमा नाटकांवरील साहित्याच्या प्रभावातूनच उत्कृष्ट कलाविष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साहित्यावर आधारित नाटक आणि सिनेमाची परंपरा असली तरी साहित्यकृती सिनेमा नाटकात जशीच्या तशी उतरेल याची शाश्वती नाही. त्यामुळे साहित्यावर आधारित तयार केलेल्या कलाकृती कमी आढळतात. मात्र, या दोन्ही कलाकृती एकत्र आल्यास रसिकांना उत्तम मेजवानी मिळू शकते, असा सूर ‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्ट’मध्ये आयोजित ‘साहित्याची सत्ता नाटक-सिनेमाकडे’ या चर्चासत्रातील सहभागी मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रख्यात नाटककार सतीश आळेकर, अजित दळवी, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे आणि माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचा या चर्चासत्रात सहभाग होता. सूत्रसंचालन संजय भास्कर जोशी यांनी केले. सिनेमापुढे साहित्याचा प्रभाव कमी झाला आहे का? साहित्य क्षेत्रातील सत्ता म्हणजे नेमकं काय? आदी प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा झाली. साहित्याचा प्रभाव हा सिनेमा नाटकांवर कायम असून, नवीन पिढी या दोन्ही माध्यमांना उत्कृष्टपणे उर्वरित.पान
चर्चासत्रातला हा विषय अत्यंत कल्पक आहे. मात्र, साहित्याचा प्रभाव दृक माध्यमांमुळे कमी झाला आहे, हे मान्य करवे लागेल. १९९१ च्या जागतिकीकरणानंतर साहित्यावर मोठा परिणाम झाला. लिहिणारे खूप आहेत, मात्र वाचणारे आहेत का? याचा विचार करायला हवा. आम्ही तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार यांना गुरुस्थानी ठेवून काम केले. आताच्या पिढीला चित्रपट- नाटकाची जाण नसली तरी इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर बिनधास्त काम करते. कोणालाही घाबरत नाही. यातूनच कोर्ट, किल्ला असे चित्रपट बनतात. किल्ला तर मला एक लघुकथा वाटते. नवीन पिढीने हे माध्यम अगदी सहजपणे स्वीकारले असून, त्यावर प्रभुत्व मिळवले आहे. मात्र, दर्जाहीन कलाकृतींना प्रेक्षकांनी हाणून पाडले पाहिजे. समाज टीव्हीवरील मालिकांच्या आहारी गेला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्ट’मध्ये ‘साहित्याची सत्ता नाटक-सिनेमाकडे’ या चर्चासत्रात सहभागी प्रख्यात नाटककार सतीश आळेकर, अजित दळवी, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे आणि माजी मंत्री विनायकदादा पाटील सूत्रसंचालन करताना संजय भास्कर जोशी.
बातम्या आणखी आहेत...