आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर बंद, ‘एफ फॉर्म’मधील त्रुटींबद्दल शिक्षेच्या विरोधात आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गर्भवती स्त्रियांच्या सोनोग्राफी तपासणीवेळी भरून घेतल्या जाणाऱ्या ‘एफ फॉर्म’मधील त्रुटींबद्दल डॉक्टरांना होणाऱ्या शिक्षेच्या विरोधात नाशकात सोनोग्राफी चालकांनी बुधवारी (दि. ९) सोनोग्राफी सेवा पूर्णपणे बंद ठेवून आयएमए हॉल येथे धरणे आंदोलन करीत कारवाईचा निषेध नोंदवला. शहरातील सर्वच खासगी सोनोग्राफी सेंटर बंद असल्यामुळे सुमारे दोन हजारहून अधिक रुग्णांची गैरसाेय झाली.
गर्भधारणापूर्व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यात सुधारणा आवश्यक असल्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नाशिक रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनवर मोर्चा काढून पुण्यातील एका डॉक्टरला ‘गर्भधारणापूर्व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्या’नुसार पुरेशी माहिती पुरवल्याबाबतच्या खटल्यात एक वर्षाचा कारावास आणि ३२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावल्याचा निषेध नोंदवला. तसेच, या कायद्यात सुधारणा आवश्यक असल्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली. महापालिका आयुक्त अाणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात कायद्यात सुधारणा करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. या वेळी डॉ. सुशांत भदाणे, डॉ. मंगेश थेटे, डॉ. नहाते, डॉ. जगदाळे आदी उपस्थित होते.
महापालिका वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ. सुशांत भदाणे, डॉ. मंगेश थेटे, डॉ. नहाते, डॉ. जगदाळे आदी उपस्थित होते.
असा मिळाला प्रतिसाद

येथे सुरू हाेती रेडिओलॉजी सेवा
महापालिकेची सर्व रुग्णालये, जिल्हा शासकीय रुग्णालय संदर्भ सेवा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटरसह इतर रेडिओलॉजी सेवा सुरू होती.

लोकशाही मार्गाने आंदोलन यशस्वी
गर्भधारणापूर्वप्रसूतिपूर्वगर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यात सुधारणा व्हावी, यासाठी राज्यभरात सोनोग्राफी सेंटर बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. अामच्या अांदाेलनाला शहरात संपूर्ण प्रतिसाद मिळाला अाहे. सर्व डाॅक्टरांनी एकजूट दाखवली. लोकशाही मार्गाने आंदोलन यशस्वी केले. डॉ. मंगेश थेटे, सचिव,नाशिक रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असाे.
हजारहून अधिक रुग्णांना बंदचा फटका
बातम्या आणखी आहेत...