आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात १५ वर्षांत तब्बल दीड लाख लाेकांना श्वानदंश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्यासात महिन्यांच्या काळात नाशिक जिल्ह्यातील अाठ हजार ५८ लाेकांना श्वानदंश झाल्याची अाकडेवारी मिळाली अाहे. त्यात महापालिका क्षेत्रातील सहा हजार ५०० लाेकांचा समावेश अाहे. गेल्या पंधरा वर्षांच्या काळात शहरात सुमारे दीड लाख श्वानदंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात अाले अाहेत. ‘चावऱ्या दहशतवादा’ला अधाेरेखित करण्यासाठी ही अाकडेवारी पुरेशी असून, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत हाेत अाहे.

भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे अनेकजणांना जीवही गमवावा लागला. त्यात बालकांचाही समावेश आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सरकारकडे वारंवार केली जात होती. तसेच, कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात महापालिका - नगरपालिकांकडेही सतत तक्रारी केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने पावले उचलावीत म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने अनेकदा दबाव टाकण्यात आला हाेता. केरळ मुंबई उच्च न्यायालयाच्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयाला प्राणीमित्र संघटनांनी आवाहन दिले होते. उच्च न्यायालयांनी दिलेल्या धोकादायक कुत्र्यांना मारण्याच्या संमतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या कुत्र्यांमुळे मानवी जीविताला धोका पोहाेचत असेल, तर त्यांना मारून टाकावे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. थाेडक्यात, मरणपंथाला लागलेल्या अाणि दुर्धर अाजाराने ग्रस्त भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची परवानगीच न्यायालयाने दिली अाहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि त्यांच्या धुमाकुळामुळे जीव मुठीत धरून रस्त्यावर चालावे लागणाऱ्या सामान्य नागरिकांना या निर्णयाने दिलासा मिळाला अाहे.

नाशिकमध्ये घातलाय धुमाकूळ
नाशिकमध्ये २०१० मध्ये श्वानांनी हजार ५५७ लाेकांना चावा घेतला हाेता. महापालिका हद्दीत एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत १० हजार ७११ व्यक्तींना कुत्र्यांनी दंश केला. एप्रिल २०१४ ते २०१५ या काळात १० हजार ५८० लाेकांना श्वानदंश झाला. गेल्या सहा महिन्यांत सहा हजार ५०० कुत्र्यांनी माणसांना चावा घेतला. जिल्हा रुग्णालयात गेल्या दहा महिन्यांत एक हजार ८८०, तर सहा महिन्यांच्या काळात १५५८ श्वानदंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात अाले अाहेत. गेल्या वर्षी दाेन हजार ३७९ रुग्णांवर उपचार करण्यात अाले हाेते.