आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेण्या वायर, उघड्या डीपी, तरी अधिकाऱ्यांची साेयीस्कर चुप्पी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावसाळ्याच्या सध्याच्या दिवसांत शहरातील उघड्या डीपींची समस्या अजूनही कायम आहे. पावसाळ्यामध्ये या डीपींतून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्त्वाच्या बाबींकडे महापालिकेसह महावितरणने साफ दुर्लक्ष केलेले दिसते. वास्तविक, डीपींची दुरुस्ती अाणि विजेशी संबंधित तत्सम नादुरुस्त उपकरणांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच हाेणे गरजेचे असते जेणेकरून शाॅकसर्किट हाेणार नाही. मात्र, विद्युत विभागाला अापल्या मूळ कर्तव्याचाच विसर पडलेला दिसताे. पावसाचे पाणी डीपीमध्ये जाऊ नये यासाठी खबरदारी घेऊन पावसाळ्यापूर्वी यावर ठोस कार्यवाही करणे अपेक्षित होते. परंतु, शाॅक लागून जीवितहानीच्या घटना घडलेल्या असतानाही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले अाहे. 
 
यांनाही धाेका... 
विजेचा शाॅक लागून शहरात दाेघांसह एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना साेमवारी (दि. १२) झालेल्या पावसात घडली. यातील नाशिकराेड येथे तरुणाचा मृत्यू विजेच्या खांबामुळे तर गायीचा मृत्यू पथदीपाच्या डीपीत वीजप्रवाह उतरल्यामुळे झाला. या घटनांनंतर प्रशासनाला खडबडून जाग येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात प्रशासनाने अापला सुस्तपणाचा स्थायीभाव कायम ठेवल्याचे चित्र मंगळवारी हाेते. बहुतांश डीपी उघड्या अवस्थेतच हाेत्या. तर काही ठिकाणी उच्च दाबाच्या विजेच्या तारा कमानींजवळ असल्याचे अाढळून अाले. त्यावर डी. बी. च्या माध्यमातून टाकलेला प्रकाशझाेत... 
 
 
{महावितरणकडून डीपीकडे लक्ष दिले जाते का? 
}शहरातीलसर्वच डीपींची देेखभाल-दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच करण्यात येते. नेहमीच काम सुरू असते. 
{शहरातीलअनेक डीपी उघड्या आहेत, त्याचे काय? 
}डीपीलादरवाजे लावण्याची कामे करण्यात आली होती. मात्र, भंगारवाले अनेक दरवाजे चाेरून नेतात. 
{नागरिकांना धोका आहे? 
}महावितरण विभागातर्फे आता नवीन प्रकारच्या डीपी लावल्या जात आहेत. त्यामुळे या डीपींमुळे धोका निर्माण होणार नाही. तसेच डीपी लावताना नागरिकांना त्याच्यापासून कुठलाही धोका निर्माण होणार नाही याची महावितरण विभागाकडून काळजी घेतली जात अाहे. 
उघड्या डीपींच्या शेजारीच काही व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. धोकादायक डीपींमुळे अपघात होऊ शकतो याची पर्वा करता या मंडळींकडून हा मार्ग स्वीकारला गेला आहे. फळविक्रेते, भाजीपालाविक्रेत्यांची दुकाने या डीपीखालीच असल्याचे दिसते. 

शहरातील बऱ्याचशा डीपींजवळ नागरिक घरातील अाेला सुका कचरा आणून टाकतात. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे परिसरात गाजरगवतही वाढल्याचे दिसते. डीपीचे लोखंडी दरवाजे तुटले असल्याने फ्यूज उघडे पडले आहेत. या सगळ्यातूनच दुर्घटनेची शक्यता वाढली आहे. 

उद्यानाच्या प्रवेशद्वाराला लागूनच उच्च दाबाच्या तारा 
गंगापूरराेडजवळीलपंपिंग स्टेशन परिसरातील अानंद उद्यानाजवळून उच्च दाबाच्या विजेच्या तारा गेल्या अाहेत. या तारा उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या इतक्या जवळ अाहेत की, पावसाळ्याच्या काळात वाऱ्याच्या हेलकाव्याने प्रवेशद्वारात विजेचा प्रवाह उतरू शकताे. असे झाल्यास अाजूबाजूच्या इमारतींतही हा वीजप्रवाह उतरण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात अाहे. तसेच नाशिकरोडच्या बोधलेनगर, उत्तरानगर, यशवंतनगर, साईसंजीवनीनगर या भागात काही ठिकाणी विजेच्या तारा इमारतींना खेटून गेलेल्या आहेत. त्यापासून अपघाताची शक्यता आहे. साईसंजीवनी अपार्टमेंटच्या इमारतीला खेटून असलेल्या विजेच्या तारेला स्पर्श हाेऊन काही वर्षापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. उपनगर, अानंदनगर, खाेडदेनगर, जेलराेड, भीमनगर अादी परिसरातही घरांजवळून विजेच्या तारा गेल्या अाहेत. घरांजवळून सर्वाधिक विजेच्या तारा सिडकाे परिसरात गेल्या अाहेत. असे चित्र दिसत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष असते. 

उघड्या डीपींचा सर्वाधिक धाेका 
रस्त्याच्या कडेला असलेल्या डीपींमध्ये पावसाचे पाणी गेल्यास शाॅर्टसर्किट हाेण्याची शक्यता असते. तसेच सखल भागात पाणी साचून वीजप्रवाह या पाण्यात उतरण्याची शक्यता असते. या रस्त्यांवरून कायमच नागरिकांची वर्दळ असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता अाता वाढली आहे. काही वेळेस जास्त दाबाने वीजप्रवाह असल्यास डीपीजवळच्या वीजवाहक तारांत स्पार्किंग होत असते. या संभाव्य प्रकारांची जाणीव महापालिकेसह महावितरणला असतानाही त्यांच्याकडून यावर काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही. डीपी झाकण्यासाठी किंवा डीपीच्या भोवती संरक्षणासाठी उपाययोजना करण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.