Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» News About Dr. Prani Lodha Accident

नाशिक: दुचाकी-कार अपघातातील गंभीर जखमी डाॅ. प्रणीत लाेढा यांचे निधन

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 07:54 AM IST

  • नाशिक: दुचाकी-कार अपघातातील गंभीर जखमी डाॅ. प्रणीत लाेढा यांचे निधन
नाशिक -रंगपंचमीच्या दिवशी दुपारी गंगापूर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव कारने माेटारसायकलला जाेरदार धडक दिल्याने माेटारसायकलवरील दाेघे डाॅक्टर गंभीर जखमी झाले हाेते. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या डाॅ. प्रणीत सुनील लाेढा यांचे रविवारी (दि. १९) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या अवघ्या सत्तावीस वर्षांच्या या तरुणावर काळाने असा घाला घातल्याने शहरातील व्यापारीवर्गासह ताे राहत असलेल्या गंगापूर राेड परिसरात, मित्रवर्गात शाेकाकुल वातावरण असून, हळहळ व्यक्त केली जात अाहे.
डाॅ. प्रणीत यांनी पंचवटी महाविद्यालयातून बीडीएस तर मुंबईच्या साेमय्या महाविद्यालयातून एम. डी. अभ्यासक्रम पूर्ण केला हाेता. रंगपंचमीच्या दिवशी एका मित्राच्या फार्महाऊसवर जाण्यासाठी ते अाणि त्यांचे मित्र डाॅ. मयूर बाेरा माेटारसायकलवरून जात असतानाच समाेरून भरधाव वेगाने अालेल्या फाेर्ड फियास्टा कारने त्यांच्या गाडीला जाेरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या डाॅ. प्रणीत लाेढा डाॅ. बाेरा यांना गावकऱ्यांनी तातडीने गंगापूरराेडवरीलच एका माेठ्या रुग्णालयात हलविले, मात्र तेथे त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यानंतर दाेन वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. डाॅ. प्रणीत यांची स्थिती मात्र गंभीर हाेती, त्यातच उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांचे वडील सुनील लाेढा यांचे पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात इलेक्ट्राॅनिक्सचे दुकान अाहे. त्यांच्या मागे एक बहीण, अाई, अाजी-अाजाेबा अाहेत. या परिवारातील ते एकुलते एक पुत्र हाेते. त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात अाले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended