आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. वर्षा लहाडेंविरोधात अखेर गुन्हा दाखल, सुटीच्या दिवशी केली कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक  - प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान चाचणी करणे, गर्भपाताच्या गाेळ्या खरेदी करणे मात्र वापराची माहिती न ठेवणे, परवानगी न घेता नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, मुंबई शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिकेकडे प्रसूतिगृहाची नाेंदणी न करणे अशा विविध गंभीर अाराेपांबाबत स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात म्हसरूळ पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.   
 
जिल्हा शासकीय रुग्णालयात २२ मार्च राेजी निफाडमधील उंबरखेड या गावातील ३१ वर्षीय मातेचा संशयास्पद गर्भपात झाला हाेता. या प्रकरणाची कुणकुण लागल्यावर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयात छापा टाकला हाेता. मात्र, गर्भपात हाेऊन जेमतेम दाेन तास हाेत नाहीत ताेच गंभीर अवस्थेतील माता गायब झाल्यामुळे पथकाचा संशय वाढला. पथकाने या प्रकरणाची चाैकशी केली असता गर्भपाताच्या कागदपत्रांत फेरफार करणे, अर्भकाची परस्पर विल्हेवाट लावणे, शवविच्छेदनाला दिलेली बगल यासारख्या गंभीर बाबी स्पष्ट झाल्या हाेत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारची १९० गर्भपाताची प्रकरणे असून, त्यात अांतररुग्ण उपचारपत्र नसल्यामुळे सखाेल चाैकशीची शिफारस महापालिका वैद्यकीय पथकाने केली हाेती. हा अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती लागल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. स्त्री भ्रूणहत्या राेखण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन लाखाे रुपये खर्चून जनजागृती करीत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयातच उमलण्यापूर्वी कळ्या खुडण्याचे काम सुरू असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस अाणल्यानंतर अाराेग्यमंत्री दीपक सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रथम अाराेग्य उपसंचालक, तर त्यानंतर अाराेग्य सहसंचालक या दाेघांमार्फत सखाेल चाैकशी केली.   
 
सुटीच्या दिवशी  केली कारवाई   
अाराेग्य संचालकांमार्फत राज्याच्या अाराेग्य विभागाच्या अपर सचिवांकडे अहवाल पाठवण्यात अाला हाेता. अामदार देवयानी फरांदे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवल्यामुळे डाॅ. लहाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात अाल्याचे अाराेग्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे अादेशही देण्यात अाल्याने महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने शनिवारी सुटीच्या दिवशीही सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन सायंकाळी ७ वाजेनंतर म्हसरूळ पाेलिस ठाण्यात जाऊन डाॅ. लहाडेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली हाेती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...