आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा शाडूच्या मूर्तींचा बाेलबाला, नाशिककरांनी 54 कार्यशाळांतून बनविल्या 3500 मूर्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील कार्यशाळांमध्ये मुले शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यात असे गढून गेले हाेते. - Divya Marathi
शहरातील कार्यशाळांमध्ये मुले शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यात असे गढून गेले हाेते.
नाशिक - पर्यावरणपूरक गणेशाेत्सवाचा वसा नाशिककरांनी घेतलेला यंदा दिसत असून गेल्या दहा-बारा दिवसांपासून शहरात शाडू मातीच्या गणेशनिर्मितीसाठी तब्बल ५४ कार्यशाळा घेण्यात अाल्या. त्यातून अाजवर सुमारे साडेतीन हजार मूर्ती तयार झाल्या असून अापल्या हाताने बनविलेल्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प हजाराे नाशिककरांनी केला अाहे. 
 
विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन अवघ्या अकरा दिवसांवर येऊन ठेपले अाहे. सगळीकडेच मूर्ती तयार करण्याचे काम पूर्णत्वास गेले अाहे. यंदा सर्वत्र इकाे फ्रेंडली गणेशाेत्सव साजरा करण्याकडे बाप्पाच्या भक्तांचा कल दिसत अाहे. त्यासाठी शाडू माती मूर्तीच्या स्थापनेस पसंती दिली जात अाहे. प्लॅस्टर अाॅफ पॅरिसच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास जलप्रदूषण वाढून पाण्यातील मासे मरतात नदीचे नैसर्गिक स्रोेतही बंद हाेतात. 
 
ही बाब लक्षात घेऊन शहरात शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबाबत जनजागृती सुरू अाहे. ‘दिव्य मराठी’नेही पर्यावरणस्नेही गणेशाेत्सवाची संकल्पना पुढे नेत सहा वर्षांपासून जागृतीचा वसा घेतला अाहे. त्याला प्रतिसाद देत विविध संस्था अाणि मंडळांतर्फे ठिकठिकाणी मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेण्यात येत अाहेत. मूर्ती बनविण्याबराेबरच रंगकामाचेही प्रशिक्षण गणेशभक्तांना या कार्यशाळांमधून मिळत अाहे. याशिवाय, विविध सार्वजनिक मंडळांनीही अाता शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापित करायला सुरुवात केली अाहे. शहरातील शाडू माती मूर्ती विक्रेत्यांकडे अशा मंडळांनी नाेंदणीही करून ठेवली अाहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शहरात शाडू मातीच्या मूर्ती अधिक प्रमाणात उपलब्ध अाहेत. 
 
घराेघरीही मूर्ती तयार 
सात वर्षांपासून शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतलेल्यांनी अाता घरीच मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले अाहे. या मंडळींच्या मूर्तींनाही अाकार अाला असून सध्या त्या सुकविण्यात येत अाहेत. दाेन-तीन दिवसांत या मूर्तींना रंगकाम सुरू हाेईल. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, ८० टक्के मूर्तींची नाेंदणीही झालीकार्यशाळांना यंदा सर्वाधिक प्रतिसाद... 
बातम्या आणखी आहेत...