आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: शिक्षणहक्कसाठी साडेसहा हजार विद्यार्थ्यांची अर्जप्रक्रिया अपूर्णच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणहक्क कायद्यानुसार शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, जिल्हाभरातील ४५८ शाळांपैकी ३८१ शाळांसाठी तब्बल १८ हजारांवर विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
 
पालकांनी एकापेक्षा जास्त शाळांमध्ये अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील तब्बल सहा हजार ५८३ विद्यार्थ्यांच्या अर्जांची प्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रवेशासाठी गुरुवार (दि. २) अखेरची मुदत असल्याने अपूर्ण असलेली प्रवेश अर्जांची प्रक्रिया पालकांनी पूर्ण करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 
 
बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०१७ २०१८ या वर्षासाठी २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. शहर िजल्ह्यातील स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) पात्र शाळांची यादी तयार करण्यात आली आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार यावर्षीही शिक्षणहक्कची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असून, पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेसाठी प्रवेशासाठी जिल्हाभरातील ४५८ शाळांपैकी ३८१ शाळांसाठी १८ हजार ४७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील सहा हजारांवर विद्यार्थ्यांची अर्जप्रक्रिया अपूर्ण असल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी पालकांनी विहित मुदतीत अर्जप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या विहित मुदतीत वाढ केली होती. त्यानुसार मार्चपर्यंत student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पालकांना ऑनलाइन अर्ज करता येतील. 
 
3 कि.मी. अंतराच्या आत सर्वाधिक अर्ज 
पूर्वप्राथमिक अर्थात नर्सरीच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांचे वय हे वयोमर्यादेच्या अटींमध्ये पात्र ठरत नसल्याने विद्यार्थ्यांवर वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता वयोमर्यादेत वाढ करण्यात आली असून, सहा महिन्यांची वयोमर्यादा वाढविण्यात आली अाहे. एक किलोमीटर अंतर असलेल्या शाळांत हजार ३४९ अर्ज तर तीन किमी अंतर असलेल्या शाळांत ११ हजार १३४ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. तीन कि.मी.च्या पुढील शाळांसाठी १५९१ अर्ज आले आहेत. प्रवेश अर्जानंतर सोडतीद्वारे पुढील प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...