आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन किमीबाहेरील विद्यार्थ्यांनाही ‘शिक्षणहक्क’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीन किलोमीटर आतील परिघामधील विद्यार्थ्यांनाच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश देण्याचा नियम असला तरी यंदापासून मात्र एक ते तीन किलोमीटरच्या आतील विद्यार्थी मिळाल्याने जागा रिक्त राहिल्यास तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असे प्रवेश मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या जागा रिक्त राहिल्यास अाठवीच्या जागा शाळांना भरता येणार नाही. 
शिक्षणहक्क कायद्यान्वये खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाल्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सध्या पालकांची धावपळ सुरू आहे. या कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणातील प्रवेशाच्या जागा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. केवळ तीन किलोमीटरच्या आत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश देण्याच्या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, यंदापासून ही अट काढून टाकण्यात अाली आहे. शासनाने काढलेल्या परिपत्रकात तसे स्पष्ट करण्यात अाले आहे. या निर्णयामुळे आता ‘शिक्षणहक्क’च्या सर्व जागा भरल्या जाणार असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्यास मदत मिळणार आहे. 
 
अशी आहे आकडेवारी 
{ जिल्ह्यातील ४८७ शाळांमध्ये सहा हजार २४८ जागा राखीव. 
{ जिल्हाभरात हजार ४९२ ऑनलाइन अर्ज प्राप्त. 
{ २४ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत. 

ठरावीक शाळांनाच पालकांची पसंती 
शिक्षण हक्काच्या प्रवेशासाठी पालकांकडून ठरावीक शाळांनाच पसंती दिली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. जिल्ह्यातील जवळपास दाेनशेहून अधिक शाळा पालकांच्या पसंतीतून बाद झाल्याची स्थिती आहे. या शाळांमध्ये पाल्याच्या प्रवेशासाठी पालकच उत्सुक नसल्याने या शाळांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. 

..तर जागा रिक्त ठेवाव्या लागतील 
^शिक्षण हक्कच्या जागा रिक्त राहिल्यास इयत्ता अाठवीच्या जागा शाळांना भरता येणार नाही. त्यामुळे शाळांनी या जागा भरण्यासाठी जास्तीत जास्त अर्ज भरून घ्यावे. त्यामुळे शाळांचेही नुकसान होणार नाही. -प्रवीण आहिरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद 
बातम्या आणखी आहेत...