आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिक्षणहक्क’अंतर्गत प्रवेशासाठी मेपर्यंत प्रवेशाची अखेरची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिकदुर्बल घटकांतील वंचित विद्यार्थ्यांना ‘शिक्षणहक्क’अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी येत्या मेपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे. शहर जिल्ह्यातील ४५ शाळांमधील रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून पालकांना आवश्यक कागदपत्रे जमा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. यानंतरही वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे पाचवी सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. 
‘शिक्षणहक्क’अंतर्गत पहिल्या तीन सोडतींमध्ये आतापर्यंत तब्बल तीन हजार ४५४ हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश मिळाल्यानंतर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (दि. मे) चौथी सोडत जाहीर करण्यात आली. त्यात १३४ विद्यार्थ्यांना ४५ शाळांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध झाली अाहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते. यंदा ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर करण्यात आली. पहिल्या फेरीत ४५७६ विद्यार्थ्यांपैकी २८२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर झाली होती. त्यात दुसऱ्या फेरीत १०६३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात ४६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. या दोन्ही फेऱ्यांमध्ये संधी मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तिसरी सोडत जाहीर करण्यात आली होती. या फेरीतही १७० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. एकूण तीन हजार ४५४ हून विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. शिक्षणहक्क प्रवेशांसाठी मे रोजी चौथ्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती कळविण्यात आली असून मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची विहित मुदत आहे. 

शाळांना १० मेपर्यंत अहवालासाठी मुदत 
चौथ्याफेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर शाळांनी ते १० मेपर्यंत प्रवेशाबाबतचा अहवाल तयार करून तो शिक्षण विभागाला सादर करावयाचा आहे. ‘शिक्षणहक्क’च्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडल्याने या वर्षी सर्वाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क मिळाला आहे. पहिल्या तीन फेऱ्यांत तीन हजारावर प्रवेश पूर्ण झाले असून चौथ्या पाचव्या फेऱ्यानंतर त्यात ५०० ते ६०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची भर पडणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...